DK Shivakumar loyalist MLAs meet in Delhi amid rising political tension in Karnataka, signaling a possible shift in state leadership.

DK Shivakumar loyalist MLAs meet in Delhi amid rising political tension in Karnataka, signaling a possible shift in state leadership.

esakal

Karnataka Congress DK Shivakumar : कर्नाटकात काँग्रेसमध्ये उलथापालथीचे संकेत! ; डीके शिवकुमार समर्थक आमदारांचा गट दिल्लीत दाखल

Karnataka Congress News : काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी केला बंगळुरूचा दौरा मात्र डीके शिवकुमार यांनी भेट घेतली नसल्याची माहिती समोर
Published on

DK Shivakumar Loyalist MLAs Gather in Delhi : कर्नाटकात आता नवीन राजकीयनाट्य घडणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. कारण, मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस आमदारांमध्ये सुरू असलेली धुसफूस आता पुन्हा एकदा समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, डीके शिवकुमार नाराज आहेत आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शुक्रवारी बंगळुरूलाही भेट दिली होती, परंतु डीके शिवकुमार यांनी त्यांची भेट घेतलेली नाही. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आळेलं आहे.

तर या राजकीय घडामोडींमध्ये, राज्याचे ऊर्जामंत्री केजे जॉर्ज यांच्या भूमिका चर्चेत आली आहे. रविवारी, ज्येष्ठ काँग्रेस नेते केजे जॉर्ज यांनी प्रथम मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची त्यांच्या घरी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दुपारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि नंतर संध्याकाळी डीके शिवकुमार यांनी जॉर्ज यांच्या घरी भेट घेतली. ही बैठक सुमारे एक तास चालली.

कर्नाटकात काँग्रेसमध्ये अशा घडामोडी सुरू असतानाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या गटाला खात्री आहे की बहुतेक आमदार त्यांच्या बाजूने आहेत. हे आणखी सुनिश्चत करण्यासाठी  मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि आमदार डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या हे दोन दिवसांपासून उत्तर कन्नड जिल्ह्यात आहेत आणि तेथील प्रत्येक काँग्रेस आमदाराची वैयक्तिकरित्या भेट घेत आहेत.

DK Shivakumar loyalist MLAs meet in Delhi amid rising political tension in Karnataka, signaling a possible shift in state leadership.
Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

तसेच, डीके शिवकुमार यांना हे देखील चांगले माहिती आहे की मुख्यमंत्र्यांकडे आमदारांची संख्या जास्त आहे आणि म्हणूनच ते त्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हायकमांडवर दबाव आणत आहेत. एवढंच नाहीतर यासाठी ते गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या समर्थक आमदारांना वेगवेगळ्या गटात दिल्लीला पाठवण्यात येत आहे.

DK Shivakumar loyalist MLAs meet in Delhi amid rising political tension in Karnataka, signaling a possible shift in state leadership.
Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

प्राप्त माहितीनुसार रविवारी दुपारी जेव्हा याप्रकरणात खरगेंनी हातवर केलेतेव्हा, संध्याकाळी उशीरा सहा ते सात आमदारांचा एक गट दिल्लीला पाठवण्यात आला , त्यांनी आज केसी वेणुगोपाल यांच्याशी भेटीची वेळ मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com