Satish Jarkiholi : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या घडामोडी; भाजप-धजदला बसणार दणका? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

बेळगाव जिल्हासह राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Satish Jarkiholi Karnataka Politics
Satish Jarkiholi Karnataka Politicsesakal
Summary

गृहमंत्री जी. परमेश्‍वर दोन दिवसांपूर्वी बेळगाव दौऱ्यावर होते. दौऱ्यामध्ये त्यांनी भाजपमधील आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बेळगाव : राज्यात ‘ऑपरेशन कमळ’ला (Operation Lotus) परतावून लावण्यासाठी ‘ऑपरेशन हस्त’ सुरू झाले असून यात भाजप आणि धजदचे २० आमदार कॉंग्रेसच्या (Congress) संपर्कात आहेत, अशी स्फोटक माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना दिली.

चामराजनगरला माध्यम प्रतिनिधींनी ‘ऑपरेशन हस्त’संदर्भात मंत्री जारकीहोळी यांना छेडल्यानंतर त्यांनी कर्नाटकामध्ये ‘ऑपरेशन कमळ’ परतावून लावण्यासाठी ‘ऑपरेशन हस्त’ सुरू केले आहे. त्यामध्ये काहींची घरवापसी होण्याची शक्यता आहे.

आमदार रमेश जारकीहोळी कॉंग्रेसमध्ये प्रवेश संदर्भामध्ये आपल्याला कल्पना नाही. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आपण बद्ध आहोत. मात्र, उघडपणे वीस आमदार कॉंग्रेसच्या संपर्कामध्ये आहेत. यामुळे ‘ऑपरेशन हस्त’ सुरू आहे. आम्ही सरकार पाडण्याचा कधीही प्रयत्न करत नाही. कर्नाटकात पक्षाची बहुमताने सत्ता आहे.

Satish Jarkiholi Karnataka Politics
Mahadev Jankar : सत्तेची घमेंड त्यांच्या डोक्यात शिरलीये, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार; जानकरांचा घणाघात

परंतु, इतर पक्षातून आमच्या पक्षात येण्यासाठी कोणी उत्सुक असल्यास त्यांचे स्वागत करण्यात येईल. काँग्रेसच्या संपर्कात असलेल्यांपैकी एका पक्षाचे (भाजप) दहा आणि आणखी एका पक्षाचे (धजद) १० असे मिळून २० आमदार संपर्कात आहेत. यामुळे ‘ऑपरेशन हस्त’ सुरू असल्याबाबतचे वृत्त खरे आहे.

यासंदर्भात बैठक, चर्चा व पक्षामध्ये आल्यानंतर त्यांना काय पदे द्यायची, यासंदर्भात बातचित सुरू आहे, असेही जारकीहोळी यांनी सांगितले. पालकमंत्री जारकीहोळी पुढे म्हणाले, ‘‘कॉंग्रेस पक्ष पुढे होऊन काही करत नाही. मात्र, त्यांच्याकडून स्वारस्य दाखविण्यात येत आहे.

Satish Jarkiholi Karnataka Politics
Prithviraj Chavan : 'वंचित'मुळे काँग्रेसचे अनेक खासदार पडले आणि त्याचा भाजपला फायदा झाला; चव्हाणांचा आंबेडकरांवर गंभीर आरोप

कॉंग्रेस पक्षाचे सिध्दांत आणि तत्व आवडत असल्यामुळे पक्षामध्ये प्रवेश करत आहोत, असे पक्षात येणाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्याला ऑपरेशन हस्त म्हणाता येईल किंवा काही जण स्वतःहून पक्षात येण्यासाठी उत्सूकता आहेत, असेही म्हणता येईल किंवा काही जणांची याद्वारे घर वापसीही होणार आहे.

ऑपरेशन हस्त हाती घेण्यामागे प्रमुख कारण हे भाजप परत सत्तेमध्ये येण्यासाठी सतत प्रयत्नशिल आहे. घड्याळ्याचा काटा कसा टिक...टिक..करतो. त्याप्रमाणे २४ तास भिती असते. भाजपची भिती कायम आम्हाला भेडसावते. या भितीपोटी आमदारांचे स्वागत सुरु आहे. त्यामुळे पक्ष अधिक स्थिर होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Satish Jarkiholi Karnataka Politics
Congress ने दावा केलेल्या 'या' दोन्ही मतदारसंघांवर आता जयंत पाटलांचाही दावा; कोण घेणार माघार? पवारांच्या भूमिकेकडं लक्ष

पहिल्यांदा गृहमंत्री, आता जारकीहोळी

गृहमंत्री जी. परमेश्‍वर दोन दिवसांपूर्वी बेळगाव दौऱ्यावर होते. दौऱ्यामध्ये त्यांनी भाजपमधील आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच पक्षाची तत्त्वे आणि सिद्धांत मान्य करून येणाऱ्यांचे स्वागत करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. त्यानंतर आज जारकीहोळी यांनी या संदर्भातील स्फोटक माहिती देऊन ‘ऑपरेशन हस्त’ला दुजोरा आहे. यामुळे बेळगाव जिल्हासह राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com