पाकिस्तानात फक्त इथं तुम्ही जाऊ शकता व्हिसाशिवाय!

टीम ई-सकाळ
Friday, 6 September 2019

कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहीबला भारतीय भाविक व्हिसाशिवाय भेट देऊ शकणार आहे. शीख बांधवांचे श्रद्धा स्थान म्हणून गुरुद्वारा दरबार साहीब ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून या विषयावरून भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा सुरू होती.

नवी दिल्ली : कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहीबला भारतीय भाविक व्हिसाशिवाय भेट देऊ शकणार आहे. शीख बांधवांचे श्रद्धा स्थान म्हणून गुरुद्वारा दरबार साहीब ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून या विषयावरून भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा सुरू होती. आता दोन्ही देशांच्या बैठकीत भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोज पाच हजार भाविक गुरुद्वारा दरबार साहीबला भेट देणार आहेत.

आणखी वाचा : Video : पंतप्रधान मोदींनी नाकाराला स्पेशल सोफा; म्हणाले, ‘खुर्चीच बरी’

कशावरून होते मतभेद?
पंजाबमधील अटारी येथे भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची  नकतीच बैठक पार पडली. या बैठकीत कर्तारपूर कॉरिडॉरसंदर्भात चर्चा झाली. भारतीय भाविकांना शुल्क आकारले जावे या मागणीवर पाकिस्तान ठाम होता. मात्र, त्यास भारतीय बाजूकडून विरोध करण्यात आला. तसेच, गुरुद्वारामध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीस पाकिस्तानकडून आक्षेप घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव एस.सी.एल. दास यांनी या बैठकीबाबत माहिती पत्रकारांना दिली. पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व मोहम्मद फैजल यांनी केले. बैठकीत दोन ते तीन मुद्दे वगळता इतर विषयांवर एकमत झाले, असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील गुरुद्वाराला दररोज पाच हजार भाविक भेट देऊ शकतील, यावरही बैठकीत एकमत झाले.

आणखी वाचा : #banetflixinIndia हिंदूंना नेटफ्लिक्सवर बंदी घाला; सोशल मीडियावर ट्रेंड

काय आहे गुरुद्वारा दरबार साहिब?
- शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांचे करतारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबमध्ये वास्तव्य होते.
- या गुरुद्वारामद्ये गुरू नानक यांचे जवळपास १६ वर्षे वास्तव्य होते.
- या गुरद्वारामद्ये संत गुरू नानक यांनी देह सोडला होता. त्यानंतर गुरुद्वारा दरबार साहिब उभारण्यात आले.
- गुरु नानक यांनी देह सोडल्यानंतर त्यांचे शरीर आपोआप नाहिसे झाले आणि तिथं काही फुलं शिल्लक राहिली, असं मानलं जातं.
- शिख बांधवांनी हिंदू रिवाजांनुसार त्यातील निम्म्या फुलांवरच अंत्यसंस्कार केले आणि समाधी तयार केली.
- उर्वरीत फुलं मुस्लिम बांधवांनी आपल्याजवळ ठेवली आणि त्यांनी गुरुद्वारा दरबार साहिबच्या बाहेर अंगणात मुस्लिम रिवाजानुसार कबर बनवली
- संत गुरू नानक यांनी याच स्थानावर आपल्या रचना आणि उपदेश लिहिले आणि पाल्या शिष्य भाई लहना यांच्या कडे सुपूर्द केले.
- पुढे याच शिष्यांना गुरू अंगद देव या नावाने ओळखले जाऊ लागले.
- गुरु नानक यांच्या याच पानांवर पुढच्या पिढीतील शिष्यांनी आपलेल उपदेश आणि रचना जोडल्या आणि त्याचा अखेर गुरूग्रंथ साहिब झाला
- शिख धर्माचा हा प्रमुख धर्मग्रंथ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kartarpur Gurdwara India-Pakistan agreed to allow five thousands pilgrims every day