Kashi Vishwanath Mandir: काशी विश्वनाथ मंदिरातील मुख्य पुजाऱ्यास ९० हजार रुपये तर कनिष्ठ अन् सहायक पुजाऱ्यांना मिळणार 'इतका' पगार

Kashi Vishwanath Temple Priest Salary : वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरातील मुख्य पुजाऱ्यास मानधन म्हणून ९० हजार रुपये मिळणार आहेत.
Kashi Vishwanath Mandir
Kashi Vishwanath Mandir

Kashi Vishwanath Temple Priest Salary : वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरातील मुख्य पुजाऱ्यास मानधन म्हणून ९० हजार रुपये मिळणार आहेत. तर कनिष्ठ पुजाऱ्याला ८० आणि सहाय्यक पुजाऱ्याला ६५ हजारांचे मानधन देण्यात येणार आहे. काशी विश्वनाथ मंदिर न्यासच्या १०५व्या बैठकीत ४१ वर्षांनंतर पुजारी सेवा नियमावलीवर एकमत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.

मंदिरातील पुजाऱ्यांची एकूण ५० पदे असतील आणि त्यांच्या भरतीसाठी जाहिरात देखील दिली जाईल. याशिवायत जिल्ह्यातील सर्व संस्कृतच्या विद्यार्थायंना श्री काशी विश्वनाथ मंदिरात फ्री ड्रेस आणि पुस्तके दिली जातील. तसेच पहिल्यांदाच मंदिर संस्कृत ज्ञान स्पर्धा देखील भरवेल. सोबतच शहरातील अनेक ठिकाणी प्रसाद देखील वाटप केला जाईल. तसेच संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाला अनुदान देखील देण्यात येईल, हे निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आले आहेत.

Kashi Vishwanath Mandir
Pakistan Election : निवडणुकीत नवाझ शरीफ पराभूत तर जेलमधील इम्रान खान समर्थकांचा बोलबाला! पाकिस्तानात कोण आघाडीवर?

१९८३ मध्ये मंदिर ताब्यात घेतल्यानंतर पुजारी सेवा नियमावली मागे पडली होती. मात्र आता नवीन बदल लागू केले जाणार आहेत. काशी विश्वनाथ मंजिरात मुख्य पुजाऱ्यांना ९० हजारांचे मानधन दिले जाणार आहे.

कनिष्ठ पुजाऱ्यांना ८०,००० रुपये आणि सहायक पुजाऱ्यांना ६५००० रुपये पगार दिला जाईल. तसचे संस्कृत विद्यालयातील ६वी पासून बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थांना मोफत पुस्तके आणि ड्रेस देण्याचा प्रस्ताव देखील या बैठकीत ठेवण्यात आला. या ठरावाला मंजूरी मिळाली असून पुढील दोन महिन्यात यावर कारवाई देखील केली जाईल.

Kashi Vishwanath Mandir
Ajit Pawar on Abhishek Ghosalkar Murder : विरोधकांकडून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न; अजित पवारांचे गोळीबाराच्या घटनांवर स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com