'आम्ही काश्मीरमध्ये सुरक्षित नाही, आम्हाला बाहेर काढा'; काश्मीरी पंडितांचं पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Letter

'आम्ही काश्मीरमध्ये सुरक्षित नाही, आम्हाला बाहेर काढा'; काश्मीरी पंडितांचं पत्र

जम्मू : काश्मीरमध्ये काल आणि परवा दोन दिवसांत सलग दोन हत्या झाल्या आणि त्यानंतर काश्मीरमधील वाद पेटला आहे. आंदोलकांकडून काश्मीरात ठिकठिकाणी आंदोलने आणि निदर्शने करण्यात येत आहेत. काल काश्मीर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा मारा केला होता. त्यानंतर आंदोलकांनी आज नायब राज्यपालांना पत्र लिहून आम्हाला काश्मीर मधून बाहेर काढा अशी मागणी केली आहे.

(Kashmiri Pandit Letter To Lieutenant Governor For Mass Resignation)

बडगाम जिल्ह्यात तहसील कार्यालयात शुक्रवारी राहुल भट्ट या काश्मीरी पंडिताची सरकारी कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती तर त्याच्या दुसऱ्या दिवशी पुलवामा जिल्ह्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलच्या घरात घुसून त्याच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काश्मीरात पंडितांनी आंदोलने आणि निदर्शने केले होते.

हेही वाचा: 'आज फुसकी सभा'; मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून भाजपाचं राऊतांना प्रत्युत्तर

दरम्यान काश्मीरमधील पीएम पॅकेज कर्मचाऱ्यांनी (पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत येणारे कर्मचारी) जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना पत्र लिहून "आम्ही काश्मीरमध्ये सुरक्षित नाही, आम्हाला सुरक्षितरित्या काश्मीरमधून बाहेर काढा, नाहीतर पीएम पॅकेज कर्मचारी आणि नॉन पीएम पॅकेज कर्मचारी सर्वजण मिळून एकत्र राजीनामा देऊ." असं म्हटलं आहे. दरम्यान दोन दिवसांत दोन हत्यामुळे जम्मूच्या काही भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Letter

Letter

हेही वाचा: लातूर : आई अन् दोन मुलींसह पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू

पुढे त्यांनी पत्रात म्हटलंय की, "आम्हाला सतत दहशतवाद्यांकडून धमक्या येत आहेत आणि या वातावरणात आम्ही काम करू शकत नाहीत. आम्हाला हिंदू असल्याने वारंवार आणि दिवसेंदिवस टार्गेट केलं जात आहे. आम्हाला आता इथे राहणं शक्य नाही. प्रशासनाने आमच्या जिवाची जबाबदारी घेत आहे तरी आमच्या हत्या होत आहेत. काश्मीरी पंडित देशात कुठेही काम करायला तयार आहे पण काश्मीरमध्ये काम करू शकत नाहीत. कारण इथे जिहादी दहशतवाद आहे." अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून आम्ही काश्मीरमध्ये सुरक्षित नाहीत आम्हाला येथून बाहेर काढा अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Kashmiri Pandit Letter To Governor Mass Resignation Murder Rahul Bhatt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top