
लातूर : आई अन् दोन मुलींसह पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू
लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव जवळील तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तलावात पाच महिलांचा कपडे धुण्यासाठी गेल्या असता बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, त्यात एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलीचा समावेश आहे.
यातील काही मजूर अहमदपूर तालुक्यातील सिद्धी शुगर साखर कारखाना येथे ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहेत. मृतांमध्ये पालम तालुक्यातील मोजमाबाद इथल्या सुषमा संजय राठोड, अरुणा गंगाधर राठोड तर रामपूर तांडा येथील राधाबाई धोंडिबा आडे आणि त्याच्या मुली काजल धोंडिबा आडे व दीक्षा धोंडिबा आडे यांचा समावेश आहे. दरम्यान किनागाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा: "सोनिया गांधींचा गैरसमज झाला तर…"; राणांवरील टिकेला भाजपचं उत्तर
लातूर जिल्ह्यात उसतोड कामगार म्हणून अनेक मजूर येतात, या पैकी काही महिला कपडे धुण्यासाठी तलावात गेल्या होत्या, पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा: केतकी चितळेवर कारवाई होणार; गृहमंत्र्यांची स्पष्टीकरण
Web Title: Five Women Drown In Lake Kingaon Latur District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..