

Home Guard Dream Shattered
Esakal
अनवाणी पायाने धावणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. होमगार्ड भरतीत १६०० मीटर धावण्याच्या चाचणीवेळचा तो व्हिडीओ होता. झारखंडमधील कविता महतोची यामुळे देशभरात चर्चा झाली. पायात ना बूट ना चपला, साडी परिधान केलेली कविता शर्यतीत धावत होती. मात्र होमगार्ड भरतीत तिला अपयश आलं. दोन मुलांची आई असलेली कविता पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळतेय. सरकारी नोकरी मिळवण्याचं तिचं स्वप्न सध्या अधुरं राहिलं.