Kawasi Lakhma : दारू प्यायल्यामुळं माणूस बलवान होतो; 'या' मंत्र्याचा अजब दावा

छत्तीसगडचे (Chhattisgarh) उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा (Kawasi Lakhma) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Kawasi Lakhma
Kawasi Lakhmaesakal
Summary

परदेशात 100 टक्के लोक दारू पितात. बस्तरमध्ये 90 टक्के लोक दारू पितात. पण, कसं प्यावं हे माहित नाही.

छत्तीसगडचे (Chhattisgarh) उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा (Kawasi Lakhma) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी दारू पिण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.

बस्तरमध्ये काही झालंतरी दारूबंदी (Alcohol Ban) होऊ देणार नाही, असे ते म्हणालेत. कवासी पुढं म्हणाले, 'दारू पिल्यामुळं माणूस मजबूत होतो. पण, जास्त पिल्यानं त्याचा मृत्यूही होतो. औषध आणि दारू एकच असून दोन्हीपैकी एक काहीतरी प्यावं लागतं.

Kawasi Lakhma
US Visa : अमेरिकेला जाण्याचा विचार करताय? मग, आधी ही बातमी वाचा; परराष्ट्र विभागानं घेतलाय मोठा निर्णय

व्हायरल व्हिडिओमध्ये कवासी लखमा म्हणताहेत, 'परदेशात 100 टक्के लोक दारू पितात. बस्तरमध्ये 90 टक्के लोक दारू पितात. पण, कसं प्यावं हे माहित नाही. दारू पिऊन माणूस मरत नाही. तर, मद्यपान तुम्हाला मजबूत बनवतं. मात्र, जास्त मद्यपान केल्यामुळं मृत्यूही होतो.'

Kawasi Lakhma
Rajasthan : आपल्याच सरकारविरुध्द उपसलं उपोषणाचं हत्यार; पायलट 'हनुमानां'चा सल्ला पाळणार?

जर मजूर दारू प्यायले नाहीतर ते जड माल उचलू शकणार नाहीत, कष्ट करू शकणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. छत्तीसगडमध्ये दारूबंदी असेल तर बस्तरमध्ये ती होऊ देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत असं काही होऊ देणार नाही. मात्र, दिल्ली आणि रायपूर सरकार दारूबंदी करू शकत नाही, असंही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com