Rajasthan : आपल्याच सरकारविरुध्द उपसलं उपोषणाचं हत्यार; पायलट 'हनुमानां'चा सल्ला पाळणार?

राजस्थानात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Rajasthan Assembly Election) काँग्रेसमध्ये (Congress) धुसफूस सुरू आहे.
Ashok Gehlot Sachin Pilot
Ashok Gehlot Sachin Pilotesakal
Summary

निवडणुकीपूर्वी गेहलोत यांच्या विरोधात नवी आघाडी उघडत पायलट हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

राजस्थानात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Rajasthan Assembly Election) काँग्रेसमध्ये (Congress) धुसफूस सुरू आहे. आपल्याच सरकारवर हल्लाबोल करत माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्री भाजप नेत्यांना (BJP) वाचवत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पायलट यांच्या वक्तव्यावर काँग्रेस (AICC) प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले, 'त्यांनी अशी पत्रकार परिषद घ्यायला नको होती. पायलट यांनी हा मुद्दा आधी माझ्यासमोर मांडायला हवा होता.'

काय म्हणाले प्रभारी रंधवा?

रंधवा म्हणाले, मी पदभार स्वीकारल्यापासून पायलट यांच्यासोबत 20 हून अधिक बैठका घेतल्या आहेत. परंतु, त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा कधीच उपस्थित केला नाही. आम्ही गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. राजस्थानमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीज बिलात सूट, सिलिंडरवर सबसिडी, जुनी पेन्शन परत आणणं अशी पावलं आम्ही उचलली आहोत.

यावेळी त्यांनी पायलट यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको होती, असंही सांगितलं. मी मंगळवारी जयपूरला जाऊन पायलट आणि गेहलोत या दोघांशी या विषयावर चर्चा करणार आहे. पायलट यांनी दोन पत्रांबद्दल बोललं आहे. मी त्यातही लक्ष घालेन आणि दोघांशी बोलेन, असंही रंधावा म्हणाले.

सचिन पायलट यांनी आरोप केला होता की, 'काँग्रेस पक्षानं सत्तेत आल्यास भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, ही सर्व प्रकरणं दडपण्यात आली आहेत. मी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दोन पत्रं लिहून आमच्यावर लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितलं. तुम्ही चौकशी केली, पण काहीही झालं नाही.'

Ashok Gehlot Sachin Pilot
Karnataka Election : मुख्यमंत्री बोम्मई 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार; भाजपची यादी आज जाहीर होण्याची शक्यता!

पायलट पुढं म्हणाले, 'जेव्हा आमचं सरकार बनलं, तेव्हा आम्ही भ्रष्टाचाराबाबत अनेक गोष्टी बोलल्या होत्या, पण आजपर्यंत काही झालं नाही. या पार्श्वभूमीवर, मी 11 एप्रिल रोजी हुतात्मा स्मारकावर एकदिवसीय उपोषण करणार आहे.'

Ashok Gehlot Sachin Pilot
Pakistan : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांकडून भारताचं पुन्हा कौतुक; इम्रान म्हणाले, आम्हालाही भारताप्रमाणं..

निवडणुकीपूर्वी गेहलोत यांच्या विरोधात नवी आघाडी उघडत पायलट हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. पायलट यांनी यापूर्वीही त्यांच्याच सरकारविरोधात बंड केलं आहे. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी नेतृत्वाचा प्रश्न सोडवावा, असा संदेशच त्यांनी पुन्हा एकदा हायकमांडला दिलाय. एवढंच नाही तर काँग्रेस पक्षानं त्यांच्या मागण्यांबाबत विचार केला नाही, तर ते मोठा निर्णय घेऊ शकतात.

Ashok Gehlot Sachin Pilot
US Visa : अमेरिकेला जाण्याचा विचार करताय? मग, आधी ही बातमी वाचा; परराष्ट्र विभागानं घेतलाय मोठा निर्णय

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (RLP) प्रमुख आणि खासदार हनुमान बेनिवाल (Hanuman Beniwal) यांनी पायलट यांना वेगळा पक्ष काढण्याचा सल्ला देताना सांगितलं की, 'मी आधीच पायलट साहेबांना वेगळा पक्ष काढण्याचा सल्ला दिलाय. त्यांनी वेगळा पक्ष काढला तर राजस्थानमध्ये आणखी चुरशीची लढत होऊ शकते. यावेळी राजस्थानमध्ये भाजपचा मार्ग अजिबात सोपा नाही. आम्ही दोघं मिळून काँग्रेस आणि भाजपला रोखू. आम्ही दोन्ही पक्षांशी युती करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com