'केजरीवाल आणि सिसोदिया 2000 कोटींच्या घोटाळ्यात सामील'

'केजरीवाल आणि सिसोदिया 2000 कोटींच्या घोटाळ्यात सामील'
Updated on

नवी दिल्ली: भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पुढे आलेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आता 2000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. भाजपचे दिल्लीतील खासदार आणि प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी असलेल्या घोटाळ्याचा खुलासा करत असल्याचे सांगितले आहे.

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे शाळांमधील खोल्या बांधण्यासाठी अतिरिक्त 2000 कोटी रूपये दिले गेले. पण, त्यासाठी केवळ 892 कोटींचीच गरज होती. त्यामध्ये 1108 कोटींचा घोटाळा झाला आहे असल्याचे मनोज तिवारी यांनी सांगितले आहे. शिवाय, ज्या 34 जणांना कंत्राट दिलं गेलं त्यामध्ये त्यांचे नातेवाईक देखील सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, घर घेताना 1500 रूपये क्वेअर फूटचा भाव लागतो. पण, केजरीवाल सरकार 8800 रूपये दरानं शाळांच्या खोल्या बांधत असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला. चांगल्या हॉटेल्सच्या खोल्यांचं बांधकाम देखील 5 हजार रूपये क्वेअर फूटने होतं. या ठिकाणी दिल्लीतील जनतेनं दिलेल्या टॅक्सचा दुरूपयोग होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com