Hemant Soren: केजरीवालांनंतर आता हेमंत सोरेन! सुप्रीम कोर्टानं ईडीच्या अटकेविरोधातील अर्ज स्विकारताच म्हणाले...

सुप्रीम कोर्टानं सोरेन यांनी ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं स्विकारली असून १७ मे रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.
Hemant Soren
Hemant SorenSakal
Updated on: 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं नुकताच दिलासा दिला. त्यांना अंतरिम जामीन मंजूर करत कोर्टानं सध्या प्रचारासाठी मुभा दिली आहे. याच धर्तीवर "केजरीवालांसाठीचे आदेश मलाही लागू होतात" असं विधान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं सोरेन यांनी ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं स्विकारली असून १७ मे रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.

Hemant Soren
Naxal Attack: गडचिरोलीत मोठी कारवाई! भामरागड तालुक्यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

हेमंत सोरेन यांच्यावर ईडीनं आर्थिक घोटाळाप्रकरणी अटक केली असून सध्या ते तुरुंगात आहेत. सोरेन यांना ईडीनं ३१ जानेवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर रांचीच्या विशेष पीएमएलए कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज नाकारला होता. पण नुकताच सुप्रीम कोर्टानं केजरीवालांना दिलासा देताना त्यांना १ जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.

Hemant Soren
Mumbai Rain: मुंबईत वादळ अन् मुसळधार पाऊस; मेट्रो बंद, विमान उड्डाणं वळवली

या निकालानंतर हेमंत सोरेन यांनी म्हटलं की, "केजरीवालांसाठी सुप्रीम कोर्टानं दिलेले आदेश मलाही लागू होतात" सोरेन यांच्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी न्या. संजीव खन्ना आणि दिपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर बाजू मांडली. ३ मे रोजी झारखंड हायकोर्टानं सोरेन यांच्या अटकेविरोधात याचिका फेटाळून लावली होती, या याचिकेला सोरेन यांच्यावतीनं सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. यानंतर खंडपीठानं ईडीला नोटीस पाठवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com