Mumbai Rain: मुंबईत वादळ अन् मुसळधार पाऊस; मेट्रो बंद, विमान उड्डाणं वळवली

Weather update Mumbai: मुंबईत वादळ अन् मुसळधार पाऊस
Storm and heavy rain in Mumbai
Storm and heavy rain in MumbaiEsakal

मुंबईमध्ये सध्या वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरु झाल्यानं त्रेधातिरपिट उडाली आहे. दृश्यमानता कमी झाल्यानं त्यातच पाऊस सुरु असल्यानं मेट्रो १ लाईन ठप्प झाली आहे. तसेच विमान तळावळील रनवे बंद झाला असून काही उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली आहे. एका तासातील पावसानं मुंबईची स्थिती बिघडवली आहे. (Mumbai unseasonal rain storm and heavy rain in mumbai metro one closed flights diverted)

वादळी वाऱ्यासह मुंबईत आज जोरदार अवकाळी पाऊस बरसला. मुंबई गेटवे ऑफ इंडिया परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण शहरासह परिसरातही ढगाळ वातावरण झालं आहे. यामुळं दृश्यमानता कमी झाली आहे. भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला आणि सायन इथं जोरदार पाऊस सुरु झाला आहे.

Storm and heavy rain in Mumbai
Naxal Attack: गडचिरोलीत मोठी कारवाई! भामरागड तालुक्यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

घाटकोपर विद्या विहार कुर्ला या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं देखील जोरदार हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अचानक पडलेल्या पावसामुळं वाहन चालकांची आणि नागरिकांची देखील तरांबळ उडालेली पहायला मिळाली.

Storm and heavy rain in Mumbai
Naxal Attack: गडचिरोलीत मोठी कारवाई! भामरागड तालुक्यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

मुंबई विमानतळावर रनवे ठप्प

मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आल्यानं काळोखाची स्थिती शहरात निर्माण झाली आहे. त्यातच सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरु असल्यानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रनवे तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. तसेच काही उड्डाणं ही इतरत्र वळवण्यात आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com