esakal | Exit Polls Kerala: पिनराई विजयन सत्ता राखणार का? जाणून घ्या कल

बोलून बातमी शोधा

kerala

Exit Polls Kerala: पिनराई विजयन सत्ता राखणार का? जाणून घ्या कल

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

Kerala assembly election 2021तिरुअनंतपुरम- चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. निवडणूक निकालाचे एक्झिट पोल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. डाव्यांच्या बालेकिल्ल्यात कोणला सत्ता मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागा आहेत. बहुमतासाठी 72 जागांची आवश्यकता आहे. सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचं म्हणजेच LDF पुन्हा सत्तेत येईल असा कयास लावला जात आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन पुन्हा सरकार स्थापन करतील असा अंदाज विविध एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: Exit Polls In Assam: भाजपचाच वरचष्मा; सत्ता राखणार; असे आहेत आकडे

India Today-Axis My India च्या एक्झिट पोलनुसार, लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला 104-120 जागा, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला 20-36 जागा, तर एनडीएला 0-2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Republic-CNX च्या एक्झिट पोलनुसार, लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला 72-80 जागा, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला 58-64 जागा, तर एनडीएला 1-5 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

हेही वाचा: Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतादीदी; भाजपची मुसंडी

केरळमध्ये बसपा, भाजप, सीपीआय, सीपीआय (एम), इंडियन नॅशनल काँग्रेस हे प्रमुख पक्ष निवडणूक लढवत आहेत. 2016 च्या निवडणुकीत एलडीएफला 83, यूडीएपला 47 जागा मिळाल्या होत्या. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. एक्सिट पोलनुसार, 2021 च्या निवडणुकीत लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला बहुमत मिळत असल्याने मुख्यमंत्री पिनराई विजयन पुन्हा सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.