esakal | माणुसकीतील ममता! महिला डॉक्टर झाली कोरोनाग्रस्ताच्या चिमुकल्या लेकराची माय 

बोलून बातमी शोधा

Corona, Covid 19

चिमुकलीचे आई वडील आता कोरोनातून सावरले असून लेकीचा सांभाळ करणाऱ्या डॉक्टर मेरी यांच त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.

माणुसकीतील ममता! महिला डॉक्टर झाली कोरोनाग्रस्ताच्या चिमुकल्या लेकराची माय 
sakal_logo
By
सुशांत जाधव

कोरोनाजन्य परिस्थितीत केरळच्या एका महिला डॉक्टरने माणुसकीचं अनोख दर्शन घडवलं आहे. माणसा-माणसात दुरावा निर्माण करणाऱ्या महा साथीच्या रोगात माणुसकी हरपत असल्याचे चित्र दिसत असताना महिला डॉक्टरने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या सहा महिन्यांच्या मुलीचा महिनाभर आपल्याकडे ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. 6 महिन्यांच्या मुलीच्या आई वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. मुलीला कोणाकडे ठेवायचे हा मोठा गहण प्रश्न या मुलीच्या पालकांना पडला. यावेळी महिला डॉक्टरने चिमुकल्या लेकराला आपल्याजवळ ठेवून घेतले. त्यांनी महिनाभर या मुलीला आईप्रमाणे सांभाळ केला.  

Video : पुण्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा; 20 जणांची मृत्यूशी झुंज

इंडियन एक्स्पेर्सच्या वृत्तानुसार, केरळमधील महिला डॉक्टर मेरी एनिथा यांनी बुधवारी एलविन नावाच्या मुलीला तिच्या आई वडिलांकडे सोपवले. मागील महिन्यात एलवीनचे वडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर आईलाही कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. ही दोघेही गुरुग्राममधील हेल्थ केअरमध्ये आरोग्य सेवक म्हणून कार्य करत होते. मुलीचे वडील गुरुग्राम तर आई केरळमध्ये आहे. आपल्या पतीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महिलेने सर्वप्रथम स्वत:ला होम क्वारंटाइन केले. त्यानंतर तिलाही कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. या परिस्थितीत सहा महिन्यांच्या मुलीला कोणाकडे ठेवावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. शिवाय ही लहान मुलगीही आईच्या संपर्कात असल्यामुळे तिला ठेवून घेणे हे चिंतेची बाब होती.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मेरी म्हणाल्या की, 14 जून रोजी डिस्ट्रिक्ट चाइल्ड वेलफेअर कमेटीने मला या मुलीसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर घरच्या मंडळींसोबत चर्चा करुन मी मुलीला माझ्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. मेरी या कोच्चीमध्ये एक संस्था चालवतात. ही संस्था लहान मुलांसाठी काम करते. 15 जून रोजी मेरी यांनी एलविन या 6 महिन्यांच्या मुलीला घेऊन आपल्या एका मोकळ्या फ्लॅटमध्ये घेऊन आल्या. जवळपास महिनाभर त्यांनी या मुलीचा सांभाळ केला. त्यानंतर बुधवारी त्यांनी या मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सोपविले. चिमुकलीचे आई वडील आता कोरोनातून सावरले असून लेकीचा सांभाळ करणाऱ्या डॉक्टर मेरी यांच त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.