esakal | सफाई कर्मचारी ते पंचायत समिती अध्यक्ष; आनंदवली यांचा संघर्षमय प्रवास!
sakal

बोलून बातमी शोधा

mcp

आनंदवल्ली दहा वर्षांपूर्वी सफाई कामगार म्हणून काम करण्यासाठी केरळच्या पतनापुरम ब्लॉक (Kerala's Kollam district) पंचायतीत आल्या होत्या,

सफाई कर्मचारी ते पंचायत समिती अध्यक्ष; आनंदवली यांचा संघर्षमय प्रवास!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कोल्लम- आनंदवल्ली दहा वर्षांपूर्वी सफाई कामगार म्हणून काम करण्यासाठी केरळच्या पतनापुरम ब्लॉक (Kerala's Kollam district) पंचायतीत आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी विचारही केला नसेल की एक दिवस त्या स्थानिक निवडणुकीत प्रमुख पदावर जातील. अनुसूचित जातीच्या आनंदवल्ली ( वय 46)  यांची नुकतीच स्थानिक निवडणुकीनंतर पंचायत अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

माकपच्या सदस्य असलेल्या आनंदवल्ली (Anandvalli) म्हणाल्या की, मला कधीही वाटलं नव्हतं की, मी इतक्या मोठ्या कार्यालयात काम करेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक जागा मिळवलेल्या माकपने पतनापूरम ब्लॉक अध्यक्ष पदासाठी आनंदवल्ली यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. आनंदवल्ली यांनी तलावपूर डिविजनमध्ये मोठ्या अंतराने विजय मिळवला आहे.  

जपान करतोय लाकडाचा सॅटेलाईट बनवण्याची तयारी;जाणून घ्या काय आहे याचा फायदा?

एलडीएफच्या नेत्या निवडल्या गेल्यानंतर आनंदवल्ली यांनी 30 डिसेंबर रोजी आपला पदभार स्वीकारला. अध्यक्षपद अनुसूचित जाती किंवा महिलांसाठी आरक्षित होते.  या यशामुळे कुटुंब, मित्र आणि स्थानिक लोक कशी प्रतिक्रिया देत आहेत, याबाबत आनंदवल्ली यांना विचारण्यात आल्यानंतर त्या म्हणाल्या की, माझं गाव खूप खूश आहे. आनंदवल्ली यांच्या कुटुंबातील अन्य काही सदस्यही माकपसोबत जोडले गेले आहेत. त्यांचे पती पक्षाच्या स्थानिक कमेटीचे सदस्य आहेत. आनंदवल्ली म्हणाल्या की, मागील आठवड्यांपर्यंत मी ज्या ब्लॉकमधील कार्यालयातील अधिकाऱ्यांना चहा पोहोचवत होते, त्यांनाही मी उच्च पदावर गेल्याचा आनंद आहे.

मला निवडणूक लढण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. सुरुवातीला मी जरा घाबरत होते, पण लोकांच्या समजावण्यामुळे मी निवडणूक लढण्यासाठी तयार झाले. प्रत्येकाने माझी मदत केली, असं आनंदवल्ली म्हणाल्या. समीक्षा बैठकीदरम्यान हॉलमध्ये अध्यक्ष, अधिकारी आणि परिषद सदस्यांना आनंदवल्ली चहा-पाणी पोहोचवायच्या. त्या सांगतात की, अशा बैठकींदरम्यान त्यांनी प्रत्येक मुद्द्यांना बारकाईने ऐकलं आहे. त्यामुळे कामकाज शिकण्यास मला वेळ लागणार नाही. 

माझं मन शेतकऱ्यांसोबत; नववर्षानिमित्त राहुल गांधींनी परदेशातून केलं ट्विट

आनंदवल्ली म्हणाल्या की, योग्य आणि न्याय निर्णयासाठी पक्ष आणि अधिकाऱ्यांना मदत करेन. आनंदवल्ली 2011 मध्ये सफाई कामगार म्हणून पंचायत कार्यालयात आल्या होत्या. 2017 मध्ये त्यांना मासिक 2000 रुपये वेतन मिळायचे, त्यानंतर ते वाढून 600 करण्यात आले होते. 

loading image