esakal | Coronavirus : कोरोनामुळे आणखी एका राज्यात रुग्णाचा बळी!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : कोरोनामुळे आणखी एका राज्यात रुग्णाचा बळी!

भारतात आत्तापर्यंत 873 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा 20 झाला आहे.

Coronavirus : कोरोनामुळे आणखी एका राज्यात रुग्णाचा बळी!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 873 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा 20 झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार आता याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. मात्र, सध्या भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे.

तसेच यातील मृतांची संख्याही वाढत आहे. सध्या 873 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये २० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला.

केरळमध्ये पहिला मृत्यू

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. केरळमध्ये आत्तापर्यंत १७६ जणांना कोरोनाची लागण झाली. तर आता ६९ वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.

loading image