केरळातील अनुसूचित जमातीतील पहिली एअर होस्टेस; 12 वर्षापूर्वी बघितले होते स्वप्न | Kerla | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोपिका गोविंद

केरळातील अनुसूचित जमातीतील पहिली एअर होस्टेस; 12 वर्षापूर्वी बघितले होते स्वप्न

कोन्नूर : आपल्या जिवनात संघर्ष करणारे माणसं आपण अनेकवेळा पाहिले असतील पण काही व्यक्तीचे संघर्ष हे खूप काही शिकवून जातात. काही जणांचे स्वप्न आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे पूर्ण होत नाहीत. पण आर्थिक परिस्थिती नसताना संघर्षमय प्रवास केरळातील आदिवासी समाजातील गोपिका गोविंद हिने केला आहे. १२ वर्षापूर्वी अवघ्या १२ वर्षाची असताना पाहिलेले एअर होस्टेस होण्याचे स्वप्न आज तिने पूर्ण केले असून राज्यातील पहिली अनुसूचित समाजातील एअर होस्टेस होण्याचा मान तिने मिळवला आहे.

हेही वाचा: मनात संशयाने घर केलंय? आनंद मूर्ती गणेशाकडून शिका या ५ गोष्टी!

केरळातील कोन्नूर जवळील अलकोडेजवळील कावुनकुडी येथील गोपिका गोविंद हि आदिवासी समाजातील, आर्थिक परिस्थिती नसलेल्या कुटुंबातील मुलगी. पण तिला एअर होस्टेस होण्याची ईच्छा लहानपणापासूनच होती. आदिवासी समाजातील स्वप्न नसलेल्या इतर मुलींसारखीच तिची परिस्थिती होती. आकाशातून विमान जायचे तेव्हा तिला त्या विमानात बसण्याची ईच्छा होत असे. तेव्हापासून तिने एअर होस्टेस होण्याचं स्वप्न उरी बाळगलं.

"मी आकाशात विमान बघायचे तेव्हा मला त्यात बसण्याची ईच्छा व्हायची. ते दिवस आत्ताही आठवतात आणि विमानाजवळ गेले की वेगळाच उत्साह शरीरात संचारतो. मी त्यावेळी जे स्वप्न पाहिले होते ते कुणालाच सांगितले नव्हते, माझ्या आईवडिलांनाही नाही. मी ज्यावेळी या कोर्सची चौकशी केली तेव्हा मी तर संपूर्ण आशाच सोडून दिली. कारण फी भरली तर मी माझ्या कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन करू शकले नसते." असं गोपिका सांगते.

हेही वाचा: लालबागचा राजा आणि आदेश बांदेकरांच्या शिवसेना प्रवेशाचं कनेक्शन, वाचा Exclusive मुलाखत

दरम्यान, आपल्याकडे खूप योजना आहेत त्या गोरगरिबांना उपयोगी पडतात. सरकारने माझी एक लाख रूपये फी भरली, मला काहीच द्यावे लागले नाही. असं म्हणत आपल्या यशाचे श्रेय सरकार आणि अकादमीच्या प्राध्यापकांना दिले. लवकरच ती एअर इंडियामध्ये रूजू होणार असून तिचा संघर्ष नक्कीच वाईट काळात आपल्याला प्रेरणा देत राहील.

Web Title: Kerla Dipika Become First St Women State Air Hostest Success Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..