

Suspicious Death of Fugitive Linked to Khan Sir Case
Esakal
ज्ञान बिंदू अकादमीचे संचालक रौशन आनंद यांचा भाऊ प्रिन्स यादवचा नेपाळमध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला आहे. नेपाळच्या विराटनगरमध्ये एका हॉटेलमधून मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. नेपाळ पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रिन्स यादव ज्ञान बिंदु अकादमीच्या संचालन आणि व्यवस्थापनाचं काम बघत होता.