किरण मजुमदार-शाॅ यांच्या इशाऱ्यानंतर बोम्मई यांची प्रतिक्रिया;म्हणाले...

वाढत्या धार्मिक फूटीबद्दल किरण मझुमदारांकडून चिंता व्यक्त
Basavaraj Bommai
Basavaraj Bommai Esakal

कर्नाटकातील वाढती धार्मिक फूट पाहून ‘बायोकॉन’च्या अध्यक्षा किरण मझुमदार-शॉ (Kiran Majumdar-Shaw) यांनी चिंता व्यक्त केली. कर्नाटकातील (Karnataka) जातीय बहिष्कार आपले जागतिक नेतृत्व नष्ट करेल, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सर्वांना संयम राखण्याचे आवाहन केले. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Basavaraj Bommai
केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यास रिफायनरी 'बारसूत'च; उदय सामंत

बोम्मई म्हणाले, अनेक मुद्दे उशिरा समोर आले आहेत. मात्र समोर आलेल्या इतर सर्व मुद्द्यांवर योग्य तो मार्ग काढला जाईल. सार्वजनिक ठिकाणी जाण्यापूर्वी सर्वांनी संयम बाळगावा. शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन केले. उपस्थित झालेल्या अनेक सामाजिक समस्या या चर्चेने सोडवल्या जाऊ शकतात असेही ते म्हणाले.

Basavaraj Bommai
'भाजप विरोधात लढण्यासाठी फक्त काँग्रेस कशाला? तालिबान,आयएसआय घ्या'
Summary

कर्नाटकातील वाढती धार्मिक फूट पाहून ‘बायोकॉन’च्या अध्यक्षा किरण मझुमदार-शॉ यांनी चिंता व्यक्त केली.

काय म्हणाल्या किरण मझुमदार-शॉ

राज्यात वाढत चाललेला धार्मिक द्वेष लवकर जर थांबवला नाही तर यात देश उद्ध्वस्त होईल. कर्नाटकने नेहमी सर्वसामावेशक आर्थिक विकास केला आहे. त्यामुळे आपण अशा सांप्रदायिक बहिष्काराला परवानी देऊ नये. जर आयटीबीटी सांप्रदायिक झाली असेल तर हे आपल्या जागतिक नेतृत्वाला नष्ट करुन टाकेल. मुख्यमंत्री बोम्मई यांनी कृपा करुन या वाढते धार्मिक विभाजन टाळावे, असे आवाहन शॉ यांनी केले आहे. त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री खूप प्रगतीशील नेते आहेत. मला खात्री आहे की ते लवकरच हा प्रश्न सोडवतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

मुद्दा हायजॅक झाला

भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी किरण मजुमदार यांना सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, त्यांचे मत पूर्वग्रह दुषित आहे. हे दुर्दैवीआहे, की किरण शाॅ सारखे लोक आपले व्यक्तिगत, राजकीय मत रंगून मांडतात. त्यास आयटीबीटी क्षेत्रातील भारताचे नेतृत्वाची साथ मिळते. राहुल बजाज यांनी ही एकदा गुजरातसाठी असे विधान केले होते. ते राज्य एक प्रमुख ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र बनले आहे. जाऊन तेथील आकडे तपासा, असा सल्ला मालवीय यांनी शाॅ यांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com