
Kishtwar Cloudburst: जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीने हाहाकार उडाला आहे. चसौती या गावात ही दुर्घटना घडलीय. यामध्ये नेमकं किती नुकसान झालंय हे अद्याप समोर आलं नाहीय. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक ती मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मछली माता यात्रेच्या सुरुवातीचा हा पॉइंट आहे. या पॉइंटवरच ढगफुटीमुळे भीषण दुर्घटना घडली आहे. यात्रेमुळे तिथं मोठ्या प्रमाणावर गाड्या आहेत. अनेक लोक या गावात राहतात. याशिवाय पर्यटकही मोठ्या संख्येने आहेत.