
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारीपासून टोल नाक्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी फास्टॅग अनिवार्य केलं आहे
नवी दिल्ली- तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करत आहात किंवा दोन प्रमुख शहरांमध्ये प्रवास करत आहात, तर तुम्हाला टोल नाक्यावर फास्टॅगचा (FASTag) बोर्ड नक्की दिसला असेल. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारीपासून टोल नाक्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी फास्टॅग अनिवार्य केलं आहे. असे असले तरी काही काळासाठी कॅश पेमेंटसाठी टोल नाक्यावरील एक लेन राखीव ठेवली जाईल.
काय आहे फास्टॅग?
जेव्हा तुमची गाडी टोल नाक्यावरुन जाते, तेव्हा टोल नाक्यावर लावण्यात आलेले सेंसर गाडीच्या विंडस्क्रीनवर असलेल्या स्टिकरला ट्रॅक करते. तुमच्या फास्टॅग अकाऊंटवरुन टोल नाक्याचे शुल्क कट होते. त्यामुळे तुम्हाला टोल नाक्यावर न थांबता पेमेंट करत येते. फास्टॅग अकाऊंटला यूपीआय/डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्डवरुन रिचार्ज केले जाऊ शकते.
पाकिस्तानला आली अक्कल; पाडलेले हिंदू मंदिर पुन्हा उभारणार
काय आहेत फायदे?
- टोल नाका तुम्हाला लवकर क्रॉस करता येईल, कारण तुम्हाला पेमेंटसाठी थांबावं लागणार नाही
- डिजिटल इंडियाच्या दिशेने तुमचे महत्वाचे पाऊल पडू शकते.
- तुमचा टोल नाक्यावर थांबण्याचा वेळ कमी होईल, त्यामुळे इंधन कमी लागेल आणि पर्यायाने प्रदुषण कमी होईल
फास्टॅगसाठी कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे?
यासाठी तुम्हाला गाडीच्या रजिस्ट्रेशनसोबत स्वत:ची आयडी द्यावी लागेल. जर तुम्ही बँकेतून स्टिकर घेणार असाल, तर तुम्हाला केवळ आरसी द्यावी लागेल.
फास्टॅगची किंमत किती आहे?
-कार, जीप, बस, ट्रक सारख्या गाड्यांनुसार याची किंमत ठरते.
जर तुम्ही पेटीएमद्वारे फास्टॅग घेणार असाल तर तुम्हाला जवळपास 500 रुपये द्यावे लागू शकतात. बँकेकडून फास्टॅगसाठी जवळपास 400 रुपये आकारले जातात. टोल नाक्यावर याची किंमत अजून कमी होऊ शकते.
Breaking: स्वदेशी भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' लशीच्या वापराला मंजुरी
फास्टॅग कसं खरेदी कराल?
राष्ट्रीय महामार्ग टोल नाका किंवा भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय, कोटक, एचडीएफसी, अॅक्सिससह अन्य 22 बँकांकडून तुम्हाला फास्टॅग खरेदी करता येऊ शकते. तुमचे बँक अकाऊंट फास्टॅगशी लिंक असल्यास तुमच्या थेट अकाऊंटमधून पैसे कट होतील.
कधीपर्यंत वैध असते फास्टॅग?
फास्टॅगची वैधता पाच वर्षांपर्यंत आहे. तुमच्या रिचार्जसाठी कोणतीही वैध्यता नाही. पण, फास्टॅगच्या वैधतेसोबत तुमचे रिचार्जही संपते.