esakal | जाणून घ्या कोझिकोडप्रमाणे लँडिंगसाठी धोकादायक असलेल्या देशातील अन्य धावपट्टींबद्दल
sakal

बोलून बातमी शोधा

kozhikode plane crash, Indias most dangerous runway

नजर टाकूयात देशातील अशा धावपट्टींवर ज्याठिकाणी लँडिंग करत असताना प्रवाशांचीच नव्हे तर वैमानिकाचाही श्वास रोखला जातो.  

जाणून घ्या कोझिकोडप्रमाणे लँडिंगसाठी धोकादायक असलेल्या देशातील अन्य धावपट्टींबद्दल

sakal_logo
By
सुशांत जाधव

केरळमधील कोझिकोडमध्ये शुक्रवारी रात्री मोठा विमान अपघात घडला. लँडिंगवेळी विमान क्रॅश झाल्यानं वैमानिकासह 17 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यात अनेकजण जखमी देखील झाले आहेत. टेबल टॉप रनवे (पठारावरील मोकळ्या जागेत असलेली धावपट्टी) मुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहेय. भारतासह जगभरात अनेक ठिकाणी धोकादायक अशा या  धावपट्टीवरुन लँडिग केले जाते. नजर टाकूयात देशातील अशा धावपट्टींवर ज्याठिकाणी लँडिंग करत असताना प्रवाशांचीच नव्हे तर वैमानिकाचाही श्वास रोखला जातो.  

हे वाचा - केरळ विमान दुर्घटना : पायलट कॅप्टन दीपक साठे यांच्यासह 14 जणांचा मृत्यू

2018 मध्ये सिक्कीम सिक्किममध्ये पहिले विमानतळ झाले. या ठिकाणच्या विमानतळाच्या लँडिंगसाठी असलेल्या धावपट्टीचा समावेशही टेबल टॉप रनवेमध्ये होतो. समुद्रसपाटीपासून 4,500 फुट उंचावर असलेल्या पाकयोंग या गावालगत दो किमीटर अंतरावर 201 एकर जमीनीवर हे विमानतळ आहे. याठिकाणी लँडिग करणेही धोकादायक असेच आहे.   

'टेबलटॉप' आहे कोझिकोडची धावपट्टी; लँडिंगसाठी समजली जाते धोकादायक

जम्मू-काश्मीरमधील लेहध्ये कुशोक बाकुला रिमपोची विमानतळावर उतरण्यासाठीही टेबलटॉप रनवेचा वापर करावा लागतो. हे विमानतळ सर्वाधिक उंचीवर असल्याने या विमानतळाविषयी अनेकदा चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते. विमानतळाची धावपट्टी समुद्रसपाटीपासून 3259 मीटर ऊंचीवर असून  टेबलटॉप रनवेशिवाय चौहूबाजूला पर्वत आणि बर्फच पाहायला मिळतो.  

मिझोराममधील लेंगपुई विमानतळाची धावपट्टी देखील पर्वत रांगामुळे लँडिंगसाठी धाकोदायक अशी आहे.  ही धावपट्टी जवळपास 2500 मीटर लांबीची आहे. भारतातील तीन विमानतळावर उतरण्यासाठी  टेबलटॉप धावपट्टीचा उपयोग केला जातो. हे विमानतळ यापैकीच एक आहे. 

मंगलोरची धावपट्टीही धोकादायक अशीच आहे.  लँडिंगसाठी टेबलटॉप धावपट्टीमुळे 22 मे 2010 रोजी एयर इंडिया एक्स्प्रेस विमानाचा याठिकाणी अपघात झाला होता. केरळमधील अपघातासारखाच हा अपघात होता.  विमान रनवेवरून घसरून  दरीत कोसळले होते.