Kranti Din: गांधीजी का पडले होते एकटे? समजवल्यानंतर नेहरुही आले सोबत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kranti Din

Kranti Din : गांधीजी का पडले होते एकटे? समजवल्यानंतर नेहरुही आले सोबत

Kranti Din : इंग्रजांनी देश सोडून जावे, यासाठी गांधीजींनी ९ ऑगस्ट रोजी 'छोडो भारत' आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाने देशात क्रांतीची लाट उसळली. त्यामुळे ९ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो.

९ ऑगस्ट १९४२ रोजी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करेंगे या मरेंगे’ अशा घोषणा देत देशातील जनतेला कार्यकर्ता नाही तर नेता बना असे आवाहन केले होते. गांधीजींनी त्यावेळी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा देत देशाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र या स्वातंत्र्य संग्रामाला हिंसक वळण आले जेव्हा प्रत्येकजण गांधीजीच्या आदेशानुसार स्वत:ला नेता समजून वाट्टेल ते करत होते.

पण तुम्हाला माहिती आहे का की यावेळी महात्मा गांधी एकटे पडले होते आणि जवाहरलाल नेहरू यांनी गांधीजीसोबत चर्चा केली होती. आज आपण याच किस्स्याबाबत जाणून घेणार आहोत. (Kranti Din special mahatma gandhi and pandit jawahalal nehru story)

वर्ष होते १९४२. ज्यावेळी गांधीजी खुप आक्रमक झाले होते. गांधीजींची आर किंवा पार अशी युद्धाची भुमिका होती. त्यावेळी त्यांनी खुले आवाहन करत देशातील जनतेला इंग्रजांविरोधात कठोर भुमिका घेण्यास सांगितले होते.

गांधीजी निर्णायक संघर्षासाठी तयार होते.यावेळी काँग्रेसला त्यांचा प्रस्ताव मान्य नव्हता. जर काँग्रेस प्रस्तावासोबत नसतील, तर एकटेच संघर्ष सुरू करतील, अशी भूमिका गांधीजींनी घेतली होती. 7 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सुरू झालेली समितीची बैठक आठवडाभर चालली. दुसरे महायुद्ध चालू होते. या दरम्यान इंग्रजांनी भारत सोडून जाण्यास भाग पाडण्यासाठी गांधीजींना चळवळ सुरू करायची होती. इंग्रजांना दबावाखाली घेण्याची हीच योग्य वेळ होती. मात्र यावर काँग्रेस समितीचे एकमत नव्हते. समितिचे म्हणणे होते की यामुळे जर्मन-जपानी फॅसिस्ट युतीविरुद्ध मित्र राष्ट्रांची लढाई कमकुवत होईल.

मतभेद असलेल्या नेत्यांमध्ये अध्यक्ष मौलाना आझाद, पंडित नेहरू, पंडित गोविंद बल्लभ पंत, सय्यद महमूद आणि असफ अली यांचा समावेश होता. मात्र एकट्याने चळवळ सुरू करण्याचा गांधीजींचा निर्धार कायम होता. त्यामुळे पुनर्विचार करण्यात आला. गांधीजींशी खुप वेळ चर्चा केल्यानंतर नेहरूंनी या आंदोलनाला होकार दिला.

समितीमध्ये संपुर्ण चर्चा झाल्यानंतर १४ जुलै रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मुंबईतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पाठिंब्यावर शिक्कामोर्तब केला. 7 ऑगस्ट रोजी मुंबईतील उद्घाटन सत्रात अध्यक्ष मौलाना आझाद म्हणाले होते की "क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर ब्रिटिशांना भारत सोडण्यास सांगण्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा पर्याय नाही."

९ ऑगस्टचा थरार इतका भयावह होता की इंग्रजांनी अगणित लोकांना अटक केली. एवढंच काय तर जेलमध्ये जागाच शिल्लक राहिली नाही. या आंदोलनात लोकांनी पोलिस ठाणे देखील नेस्तनाबूत केले. टेलिफोन सुविधा बंद केल्या. त्यामुळे भांबावलेल्या ब्रिटिश सरकारने आंदोलकांवर गोळीबार सुरु करण्याचा आदेश दिला. मात्र लोकांनी न घाबरता आंदोलन सुरु ठेवले.

ब्रिटिशांनी या प्रकरणी महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक केली. ब्रिटिशांनी महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेतेमंडळींनाही गुप्त जागी ठेवण्यात आले. परंतु ही बातमी जेव्हा फुटली, तेव्हा आंदोलन अधइक तिव्र झाले. लोकांनी ब्रिटिश सरकार विरोधात प्रचंड हिंसक आंदोलने केले. या जनआंदोलनामुळे जरी प्रचंड उद्रेक झाला असला तरी यामुळे एक नवी क्रांती घडून आली. या आदांलनाने इतिहासात आणखी एका किस्स्याची नोंद झाली.