कुलगाममध्येही 'पहलगाम पॅटर्न'? धर्म विचारून मजुरांची हत्या? तपास सुरू

Kulgam Terror Attack : कुलगामध्येही पहलगाम सारखीच घटना घडली का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, या दाव्याला सुरक्षा यंत्रणांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Kulgam Terror Attack

Kulgam Terror Attack

esakal

Updated on

शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी मजुरांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. पण त्यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी मृतकांना त्यांचा धर्म विचारल्याचा दावा आता कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे कुलगामध्येही पहलगाम सारखीच घटना घडली का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, या दाव्याला सुरक्षा यंत्रणांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com