Madhya Pradesh : लाडकी बहीण योजनेचा ३८ वा हप्ता जमा; १.२५ कोटी महिलांच्या खात्यात १८३५ कोटी रुपयांची थेट मदत

मध्य प्रदेशातील कोट्यवधी महिलांसाठी १२ जुलै २०२६ हा दिवस आनंदाचा ठरला.
ladki bahin scheme madhya pradesh

ladki bahin scheme madhya pradesh

sakal

Updated on

मध्य प्रदेशातील कोट्यवधी महिलांसाठी १२ जुलै २०२६ हा दिवस आनंदाचा ठरला. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भिंड जिल्ह्यातील लहार येथून राज्यातील १.२५ कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा ३८ वा हप्ता म्हणून १,८३५ कोटी रुपये एका क्लिकवर जमा केले. याच कार्यक्रमात त्यांनी भिंड जिल्ह्यातील ३२२.२९ कोटी रुपयांच्या ५६ विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही केले.

यावेळी लहार येथील शासकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची तसेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भिंडमध्ये चार नवीन सांदीपनी विद्यालये सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com