esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur: शेतकऱ्यांना टाळून भाजप नेता भेटला ड्रायव्हरच्या कुटुंबियांना

Lakhimpur: शेतकऱ्यांना टाळून भाजप नेता भेटला ड्रायव्हरच्या कुटुंबियांना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : लखीमपूर (lakhimpur kheri violence) घटनेच्या तब्बल दहा दिवसांनंतर उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रिजेश पाठक यांनी काल बुधवारी लखीमपूरला भेट दिली. या नृशंस घटनेनंतर त्याठिकाणी जाणारे ते भाजपचे पहिलेच वरिष्ठ नेते ठरले आहेत. मात्र, त्यांची ही भेट देखील वादग्रस्त ठरली आहे. कारण या भाजप नेत्याने या भेटीमध्ये फक्त लखीमपूर घटनेमध्ये मृत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचीच भेट घेतली आहे. यामध्ये कार्यकर्ता शुभम मिश्रा आणि गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा ड्रायव्हर हरि ओम मिश्रा यांच्या कुटुंबियांना त्यांनी भेट दिलीय. मात्र, त्यांनी या घटनेत ज्या शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आलंय त्यांच्या कुटुंबियांना भेट दिलीच नाहीये. नछत्तर सिंग, लव्हप्रीत सिंग, श्याम सुंदर निशाद आणि पत्रकार रमन कश्यप यांच्या कुटुंबियांना भेट देण्याचं त्यांनी टाळलं आहे.

हेही वाचा: Lakhimpur Kheri : आशिष मिश्राचा जामीन अर्ज फेटाळला; 2 अटकेत

याबाबत स्पष्टीकरण देताना पाठक यांनी म्हटलंय की, घटना घडली त्या ठिकाणाच्या जवळच ते राहतात, त्यामुळे परिस्थिती सामान्य झाल्यावर मी लवकरच निशाद आणि कश्यप यांच्या कुटुंबियांची भेट घेईन. मात्र, पाठक यांनी केलेल्या या प्रकाराबद्दल विरोधकांनी त्यांना धारेवर धरलंय. शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी म्हटलंय की, भाजप नेत्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी जाणं घाईचं ठरेल. कुटुंबियांकडून त्यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. त्यामुळे जर कुणी जात असेल तर त्यांनी आधी परवानगी घेऊन मगच जावं, असं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदाराची गंभीर चूक

दुसरीकडे, लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशीष मिश्रा याचा जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी (ता.१३) फेटाळला. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना विशेष तपास पथकाने अटक केली.

loading image
go to top