esakal | लष्करे तैयबाच्या सहा दहशतवाद्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

lashkar-e-taiba

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात लष्करे तैयबाची कार्यपद्धती अवलंबलेल्या संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी सोमवारी अटक केली. या वेळी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लष्करे तैयबाच्या सहा दहशतवाद्यांना अटक

sakal_logo
By
पीटीआय

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात लष्करे तैयबाची कार्यपद्धती अवलंबलेल्या संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी सोमवारी अटक केली. या वेळी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अटक करण्यात आलेले दहशतवादी ‘द रेसिस्टन्स फ्रन्ट’ या नावाने दहशतवादी संघटना चालवायचे असे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. पोलिसांना केरण येथून शस्त्रे व दारूगोळ्यांच्या वाहतुकीविषयी माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी याचा शोध घेण्यासाठी चार पथकांची स्थापना करून नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर आणि कुपवाडा जिल्ह्यातील केरण येथे राबवलेल्या शोध मोहिमेनंतर अहिषम फारुख मलिक, शफाकत अली तगू, मुसाईब हसन भट आणि निसार अहमद गनाई या चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी या वेळी दिली. 

पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा बोलणार, आता काय?

यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर हे चारही जण पाकिस्तानातील अँड्रू जोन्स नावाच्या व्यक्तीच्या हाताखाली काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर केरणमधील आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून कबीर लोणे आणि शराफत अहमद खान अशी त्यांची नावे आहेत. या वेळी त्यांच्याकडून आठ एके रायफल, २५ एके मॅगझिन्स, ८९ हातबॉम्ब आणि २१ डिटोनेटर फ्यूज जप्त करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री पटनाईक यांनी दिले 3 महिन्यांचे वेतन