शब्दांपलिकडच्या वेदना! PM मोदींनी वाहिली लतादिदींना श्रद्धांजली

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लतादीदींना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. लता मंगेशकर यांच्यासोबतचा एक फोटो मोदींनी शेअर केला आहे.

नवी दिल्ली - भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या २८ दिवसांपासून उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लतादीदींना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. लता मंगेशकर यांच्यासोबतचा एक फोटो मोदींनी शेअर केला आहे. तसंच लतादिदींच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून न निघणारी आहे.

पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं की, लता मंगेशकर यांच्या निधनाने झालेलं दु:ख शब्दांच्या पलिकडे आहेत. लता दिदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झालीय, ती भरून काढता येणार नाही. येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्या कायम स्मरणात राहतील. लता मंगेशकर यांच्या आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय अशी क्षमता होती.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जीवन प्रवास

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिरही झाली होती, मात्र ५ फेब्रुवारीला अचानक प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मंगेशकर कुटुंबातील अनेकांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. आज सकाळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ब्रीच कँडीमध्ये जाऊन लता मंगेशकर यांच्या तब्येतीची माहिती घेतली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लता मंगेशकर यांचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com