Marathi News Live Updates : जळगावच्या किनगावमध्ये विजयादशमीच्या मिरवणुकीला अडथळे, हिंदूंच्या अंत्ययात्रांनाही विरोध झाल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Breaking Marathi News Live Update : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या, हवामान अपडेट्स, सरकारी निर्णय, गुन्हेगारी आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.
Latest Marathi Live Update News

Latest Marathi Live Update News

esakal

Jalgaon Live जळगावच्या किनगावमध्ये विजयादशमीच्या मिरवणुकीला अडथळे, हिंदूंच्या अंत्ययात्रांनाही विरोध झाल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे उलटूनही विजयादशमीचा उत्सव आणि मिरवणुका काही भागांतून जाऊ दिल्या जात नसल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. हिंदूंच्या अंत्ययात्रांनाही काही ठिकाणी अडथळ्यांचा सामना करावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारांना जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे सांगत सोमय्या यांनी या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. भारतात अशा कट्टर मानसिकतेला यापुढे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे किनगावमधील विजयादशमीच्या मिरवणुकीचा आणि धार्मिक कार्यक्रमांदरम्यान निर्माण झालेल्या अडथळ्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com