Live Update
Live UpdateEsakal

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

लोकसभा निवडणुकीपूर्वी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) देशात लागू करण्यात येईल,’’ अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केलीये.

मुंबईत सहा बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक

मुंबईत बेकायदा वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना तीन वेगवेगळ्या कारवायांत पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अमिना उमर फारूख शेख, इम्रान आलम शेख, तमजीत शौकत मुल्ला, आलमीन जावेद सरदार, हसन नूरइस्लाम मोरल आणि सुकेराली खालेक मंडल अशी त्यांची नावे असून, ते सर्व बांगलादेशी नागरिक आहेत.

भाजप मैत्री आणि योगदान विसरला- आदित्य ठाकरे

भाजप हा पक्ष शिवसेनेसोबतची मैत्री आणि योगदान विसरला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची आमची मागणी आहे, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांसह भाजपचे आमदार मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या निवासस्थानी दाखल

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची फ्लोर टेस्ट उद्या, १२ फेब्रुवारीला विधानसभेत होणार आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्यासह भाजपचे इतर आमदार पाटणा येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधून उमेदवार जाहीर केले आहेत.

Tamil Nadu BJP national president JP Nadda : पंतप्रधान मोदींसाठी तमिळनाडू कायमच खास राहिला आहे- जेपी नड्डा

पंतप्रधान मोदींसाठी तमिळनाडू कायमच खास राहिला आहे. त्यामुळेच त्यांनी एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला आहे, असं भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले आहेत.

Bihar Congress MLAs arrive at Patna airport: काँग्रेसच्या आमदारांचे पाटणाच्या एअरपोर्टवर आगमन

काँग्रेसचे आमदार बिहारमध्ये परत आले आहेत. उद्या बहुमत चाचणी आहे. त्यामुळे आमदारांना हैद्राबादमध्ये ठेवण्यात आलं होतं. ते आता तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे.

Nana Patole: हिंदूंचे सरकार असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ कशी येते?- नाना पटोले

कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व त्यांचे सरकार स्थापन केले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाचा पराभव केला व काँग्रेसला बहुतमताने निवडून दिले. महाराष्ट्रातील सरकार ही जनतेने निवडून दिलेले नसून ED, CBI चे सरकार आहे असा घणाघात करत आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट सरकारचा पराभव करुन काँग्रेसला विजयी करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

टिळक भवन येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एसी. सी. विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री विश्वजित कदम, खासदार कुमार केतकर, एसी. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबीरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, संजय राठोड, नामदेव उसेंडी, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्रातील भ्रष्ट युती सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृहमंत्र्यांचे आहे परंतु “गाडीखाली कुत्रा आली तरी विरोधक राजीनामा मागतील” असे विधान त्यांनी केले. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंवर हल्ला करण्यात आला, नागपुरात खून, मुंबईत गोळीबाराच्या घटना घडल्या, जनता भयभीत आहे परंतु सरकार, मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री उत्तर देण्यास तयार नाही. गुन्हेगारांवर कारवाई केली जात नाही, महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत खराब आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाने राज्यपाल महोदयांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील विभागवार आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा नुकताच पूर्ण केला आहे. आता १६ व १७ फेब्रुवारीला लोणावळा येथे शिबीर होत आहे. या शिबीरातही निवडणुकीच्या तयारीवर चर्चा केली जाईल, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे या शिबीराचे ऑनलाईन उद्घाटन करतील. लोकसभा निवडणुका व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत यासाठी महाविकास आघाडी मजबूतपणे मैदानात उतरणार आहे. मविआमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. दिल्लीत एक व मुंबईत दोन बैठका झाल्या आहेत लवकरच अंतिम निर्णय होईल, असेही चेन्नीथला यांनी सांगितले.

CAA संदर्भात प्रश्न विचारला असता रमेश चेन्नीथला म्हणाले की, निवडणुक आली की भारतीय जनता पक्ष अशी जुमलेबाजी करत असतो. हे विधेयक मंजूर होऊन काही वर्ष झाले, या वर्षभरात त्यांना ते लागू करावे असे का वाटले नाही, आताच का ते CAA ची चर्चा करत आहेत. कारण त्यांना निवडणुकीत धार्मिक मुद्दा चर्चेत आणायचा आहे. CAA ला भाजापाशासित काही राज्यांचाही विरोध आहे, त्यामुळे CAA हा केवळ ‘चुनावी जुमला’ आहे, असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

हिंदूंचे सरकार असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ कशी येते?

राज्यात काही संघटना हिंदू आक्रोश मोर्चा काढत आहेत यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हिंदूंचे सरकार आले असे भाजपाचेच लोक जाहीरपणे सांगत असतात. दिल्लीत व राज्यातही हिंदूंचेच सरकार आहे मग हिंदू समाजाला आक्रोश मोर्चा का काढावा लागत आहे. या सरकारने महागाई, बेरोजगारी वाढवून हिंदूंचे नुकसान केले आहे. हिंदू धर्माचे चारही शंकराचार्य भाजपा सरकारच्या तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात आहेत. प्रभू रामचंद्राच्या नावाखाली भाजपाने जे राजकारण केले त्यावर शंकरार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे. खरे साधू संत हे भाजपाच्या विरोधातच आहेत असेही नाना पटोले म्हणाले.

Haldwani, Uttarakhand: उत्तराखंडमधील हल्दवानीमधील हिंसाचारानंतर कसं आहे चित्र? पाहा ड्रोन व्हिडिओ

उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये अनधिकृत मदरशा हटवल्यानंतर हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारानंतर परिसरातील चित्र ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलं आहे.

Amit Shah: म्हैसूरमधील चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन अमित शहांनी घेतले दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकच्या म्हैसूरमधील चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. यासंदर्भातील व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.

Delhi Minister and AAP leader Atishi : 'घर घर राशन' योजना दिल्लीत राबवण्यासाठी आपला मतदान करा- आतिशी

आप सरकार दिल्लीमध्ये आल्यास घऱ घर राशन योजना राबवली जाईल, अशी माहिती आपच्या नेत्या आतिशी यांनी दिली आहे. केंद्र सरकारने ही योजना राबवणे थांबवले होते असा आरोप त्यांनी केला आहे.

बलकवडी कॅनॉल मधून दोघे गेले वाहून!

बलकवडी कॅनॉल मधून अजनुज (ता .खंडाळा ) या गावातील दोघेजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील एक जण मयत सापडले असून दुसऱ्याचा शोध  सुरू आहे.

Eknath Shinde:ठाकरेंनंतर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्लात येणार पवारांचं वादळ!

Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी कल्याण दौऱ्यावर येत असून उल्हासनगर येथे एल्गार परिषदेत उपस्थित राहणार आहेत. पक्षाचा ताबा आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच पवार हे कल्याण येथे येत आहेत.

PM Modi: "काँग्रेसने आदिवासी तरुण आणि मुलांकडे दुर्लक्ष केले - पंतप्रधान मोदी

अनेक वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसने आदिवासी तरुण आणि मुलांची काळजी घेतली नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले , असे प्रतिपदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले

Railway: पश्चिम रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक; गाडयांना होणार उशीर

पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकादरमान्य रोड ओव्हर ब्रिजच्या आणि गर्डर टाकण्यासाठी सोमावर ते बुधवारपर्यत दररोज मध्य रात्री १ तास १५ मिनिटाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई येणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाडयांना उशीर होणार आहे.

एनडीए एकजुटीने उभा आहे आणि उद्या बहुमत मिळवेल - केंद्रीय मंत्री नित्यानंद राय

बिहारमध्ये उद्या विधानसभेची फ्लोअर टेस्ट पार पडणार आहे. त्यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नित्यानंद राय म्हणाले की, 'एनडीए एकजुटीने उभा आहे आणि उद्या बहुमत मिळवेल.

Mallikarjun Kharge : काँग्रेसचं सरकार आल्यानंतर कृषी कायदे काढणार

जर भाजप सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले नाहीत, तर 2024 मध्ये आमचं सरकार आल्यावर आम्ही ते काढून टाकू; असं मत मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केलं आहे. ते पंजाबमधील लुधियानात बोलत होते.

Ayodhya Ram Mandir : अरविंद केजरीवाल घेणार राम मंदिरात दर्शन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे अयोध्येच्या राम मंदिराला भेट देणार आहेत. 12 फेब्रुवारी, म्हणजेच उद्या हे दोघे अयोध्येला जातील.

आदिवासी समाज व्होट बँक नाही, तर देशाची शान - पंतप्रधान मोदी

"भाजपसाठी आदिवासी समाज हा व्होट बँक नाही, तर ते देशाची शान आहेत" असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं. ते मध्य प्रदेशमध्ये बोलत होते. भाजप स्वबळावर 370 जागांवर निवडून येईल असंही ते यावेळी म्हणाले.

Ajit Pawar : शिवजयंतीनिमित्त राज्यात साजरा होणार 'स्वराज्य सप्ताह'

यंदाच्या शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन अजित पवारांनी केलं. 'स्वराज्य सप्ताह' असं नाव या कार्यक्रमाला दिलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

नेहरूंपेक्षा जास्त काळ भाजप सत्तेत, मग...; ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदींवर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. नेहरूंपेक्षा जास्त काळ भारतीय जनता पक्षाने सत्तेमध्ये भोगलेला आहे. त्यांनी सत्तेत असताना काय केलंय, ह्याचा आढावा कोण घेणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे. ते मुंबईतील एका कार्यक्रमात ठाकरे बोलत होते,

अकोल्यात  शाळेच्या छतावर नवजात अर्भक सापडल्याने खळबळ

अकोल्यात नवजात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दु माध्यमीक शाळेच्या छतावर नवजात अर्भके सापडलं आहे. क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा चेंडू शाळेवर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

PM Modi Latest News : PM मोदींकडून 7,500 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील झाबुआ येथे 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

Vidarbha Rain Alert : येत्या २४ तासात विदर्भात विजांचा कडकडाटासह वारा अन् पावसाची शक्यता

आज (11 फेब्रुवारी) lMD मॉडेलच्या मार्गदर्शनानुसार, पुढील 24 तासांत विदर्भाच्या काही भागांत आणि आजूबाजूला विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा, पाऊस, हलक्या ते मध्यम गडगडाटाची शक्यता आहे. त्याचा अधिक परिणाम पूर्व विदर्भावर होऊ शकतो. अशी माहिती पुण्या भारतीय हवामान विभागाचे प्रमुख् के एस होसाळीकर यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

अंडर-१९ विश्वचषक भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला देणार आव्हान

अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांना भिडणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे.

पंचकुला भागात शेतकरी आंदोलनामुळे कलम १४४ लागू

शेतकरी आंदोलनामुळे पंचकुला भागात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

राज्यातील अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.

वागळेंवर हल्ले करणाऱ्यांची परेड का नाही काढली?- संजय राऊत

काही दिवसांपुर्वी पत्रकार निखील वागळे, वकील असीम सरोदे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यावरुन संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांवर टीका केली. गुंडांची परेड काढणाऱ्या आयुक्तांनी या हल्लेखोरांची परेड का नाही घेतली, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Raj Thackrey : राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर; लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर तयारी सुरू

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे कार्यलयात कार्यकर्ते व पदाधिकारी यांना भेटण्याची शक्यता आहे. उद्यापासून दोन दिवस राज ठाकरे ग्रामीण भागात असणार आहेत. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगेच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस; सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी

मनोज जरांगेच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुणे दौऱ्यावर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुणे दौऱ्यावर आहेत. ते काल रात्री पुण्यात दाखल झाले. पुण्यातील भाजप नेत्यांनी त्याचं स्वागत केलं. ते आज आंळदीत एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

NCP: पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे शिबीर

पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे शिबीर पार पडणार आहे. अजित पवार गटाचा बालेवाडीमध्ये युवक काँग्रेस मेळावा तर शरद पवार गटाचा निर्सग मंगल कार्यालयाच शरद पवार गटाचा मेळावा पार पडणार आहे.

Central Railway : आज पुणे ते लोणावळा तांत्रिक कामासाठी घेण्यात आला 'ब्लॉक'

 मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आज पुणे ते लोणावळा तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळं पुणे ते लोणावळा १४ लोकल गाड्यांवर परिणाम झाला आहे. 

Mumbai Police : मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला धमकीचा मेल

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला धमकीचा मेल आला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. धमकीच्या मेलमध्ये अमेरिकन कॉन्सुलेट जनरलचे कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Live Update
Mumbai Crime News : मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला धमकीचा मेल, एफआयआर दाखल

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी मंगळवारपासून 'यूएई'च्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारपासून (ता. १३) संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ‘यूएई’चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचेही उद्‍घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार २०१५पासून मोदी यांचा यूएईचा हा सातवा दौरा आहे.

U19 World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 संघांमध्ये आज 'फायनल'

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 संघांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारताच्या 'उदय ब्रिगेड'कडे जुना वचपा काढण्याची संधी आली आहे. हा सामना आज, रविवारी (दि. 11) बनोनीच्या विलमूर पार्कवर खेळवण्यात येणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 2 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती.

Ayodhya Ram Mandir : आज मुख्यमंत्री योगींसह संपूर्ण मंत्रिमंडळ घेणार अयोध्येत प्रभू रामललाचं दर्शन

आज (रविवार) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संपूर्ण उत्तर प्रदेश सरकार अयोध्येत प्रभू रामललाचं दर्शन घेणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना हेही उपस्थित राहणार आहेत. शनिवारी विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृहात सांगितलं की, कोणताही आमदार किंवा मंत्री स्वत:च्या वाहनानं अयोध्येला जाणार नाही, त्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री योगी राज्याच्या विमानानं येणार आहेत. मंत्री आणि आमदार लखनौहून 10 लक्झरी बसमधून येथे पोहोचतील.

दहशतवाद्यांना निधी पुरविल्याच्या संशयावरून जम्मू-काश्‍मीरमध्ये 'एनआयए'चे 15 ठिकाणी छापे

जम्मू, श्रीनगर : दहशतवाद्यांना निधी पुरविल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये १५ ठिकाणी छापे घातले. जम्मूमधील गुज्जरनगर आणि शाहिदी चौक या ठिकाणांचा यात समावेश आहे. एक खासगी शाळेचे कार्यालय आणि त्या संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवरही छापे घालण्यात आले आहेत. जमाते इस्लामीचा माजी प्रमुख शेख गुलाम हसन आणि सायर अहमत रेशी या दोघांच्या कुलगाम जिल्ह्यांतील निवासस्थानीही तपासणी करण्यात आली.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण सुरु

Latest Marathi News Live Update : सतराव्या लोकसभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन विकसित भारताचा मजबूत पाया रचल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. सतराव्या लोकसभेच्या अखेरच्या बैठकीत समारोपाचे भाषण करताना पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेतला. तसेच ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) देशात लागू करण्यात येईल,’’ अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलीये. या शिवाय, राज्य सरकारने दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे, अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारपासून (ता.१०) तिसऱ्यांदा बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसून आणि इम्रान खान, नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्याकडून दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. त्याचबरोबर दिल्लीत पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कूच केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी 'दिल्ली चलो'ची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. यामध्ये सुमारे २०० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. तसेच देशभरात वातावरणातही बदल जाणवत आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com