Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

ममता बॅनर्जींच्या इंडिया आघाडीबाबत आलेल्या वक्तव्यानंतर सीपीआय (एम) नेत्याची टीका
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal

११ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर

तब्बल ११ तासांची चौकशी झाल्यानंतर रोहित पवार ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या सोबत सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांची उपस्थिती आहे.

संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीचं समन्स

संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीने समन्स पाठवलं असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. खिडची घोटाळ्यात राऊत यांना समन्स पाठवण्यात आलेलं आहे.

शरद पवार ईडी कार्यालयाकडे रवाना

रोहीत पवार यांच्या ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.

प्रजासत्ताक दिनापूर्वी भारतीय लष्कर अन् जम्मू-काश्मीर पोलीस सतर्क

प्रजासत्ताक दिनापूर्वी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस सुरक्षा तपासणी आणि लोकांची चाचपणी करत आहेत.

न्यायमूर्ती प्रसरमा भालचंद्र वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती प्रसरमा भालचंद्र वराळे (कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश) यांची नियुक्ती केंद्राने अधिसूचित केली.

अंबरनाथ एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये एका कंपनीला आग लागली आहे. कॅनेरा इंजिनिअरिंग या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

अचानक हँडब्रेक लावल्याने मी जखमी झाले- ममता बॅनर्जी

अपघातानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मला ताप येत असल्याचे जाणव असून थंडी वाजत आहे. माझ्या कारसमोर अचानक एक वाहन आले. हँड ब्रेक लावल्यामुळे मी वाचले आणि मला दुखापत झाली." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मुंबईतल्या गोरेगाव येथील एका इमारतीला आग

गोरेगाव येथील एका इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. काही वेळापूर्वी आग आटोक्यात आल्याची माहिती आहे.

आठ तासांपासून रोहित पवारांची ईडी चौकशी सुरु

आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. तब्बल आठ तासांपासून ईडी कार्यालयात त्यांची चौकशी सुरु आहे.

तब्बल दहा किलोमीटरपर्यंत मराठा मोर्चाची रांग

मराठा आरक्षणाचा मोर्चा आता पुण्यातील शिवाजी नगर भागात पोहोचला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १० किलोमीटरपर्यंत मराठा मोर्चाची रांग लांबलेली आहे. त्यावरुन या मोर्चाचा अंदाज येऊ शकतो.

मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला पुण्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पुण्यात रहदारीच्या ठिकाणी पोहोचलेला आहे. पुण्यात मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय.

शिंदे समितीला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला सरकारने २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिंदे समिती राज्यातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम करीत आहे.

Latest Marathi News Live Update : सचिन पायलट यांचे भारत जोडो न्याय यात्रेबाबत मोठं वक्तव्य

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही छत्तीसगडमध्ये दाखल होत आहे. यावेळी छत्तीसगड काँग्रेसचे प्रभारी सचिन पायलट यांनी सांगितले की या यात्रेमुळे एक वातावरण निर्मिती होईल. याचा नक्कीच पक्षाला फायदा होणार आहे. ही यात्रा ऐतिहासिक होईल आमि यामुळे देशात बदल होईल असा संदेश देखील जाईल.

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जींच्या इंडिया आघाडीबाबत वक्तव्यावर सीपीआयची प्रतिक्रिया

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या इंडिया आघाडीबाबतच्या वक्तव्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राज्यसभा खासदार बिकेश रंजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की ममता बॅनर्जी या भाजपची नैसर्गिक सहकारी आहेत.

Latest Marathi News Live Update : नरेंद्र मोदी बुलंदशहरला देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 जानेवारीला उत्तर प्रदेशातील बुलंदशहरला भेट देणार असून तेथे ते जवळपास 19,100 कोटी रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.

मंत्री उदय सामंत लीलावती रुग्णालयात दाखल!

उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानं मंत्री उदय सामंंत हे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

जरांगेंच्या पदयात्रेचा मार्ग बदलला! विद्यापीठ चौकात कोंडी होण्याची शक्यता

मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा हा आता पुणे शहराच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे. दरम्यान या मार्गात बदल झाल्याची माहिती पुणे वाहतूक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. या मोर्चामुळे विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणावर कोंडी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जाहीर!

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात दादरच्या शिवाजी पार्क येथे जमतात. यावेळी कुठलाही घातपात, किंवा अन्य घटना होऊ नयेत म्हणून मुंबई पोलिसांकडून कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश हे जारी केलेले आहेत

मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, सुळेंनी काढली कार्यकर्त्यांची समजूत

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.

Manoj Jarange: जरांगेनी निजामी मराठ्यांपासून सावध रहावं- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar on Manoj Jarange: प्रकाश आंबेडकर मनोज जरांगे यांना म्हणाले की, 'जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून सावध रहावं.'

Vengurla banner: वेंगुर्ल्यात वादग्रस्त पोस्टरवरुन वाद

वेंगुर्ल्यात वादग्रस्त पोस्टरवरुन वाद बघायला मिळाला. यावेळी पोलिसांच्या शिष्टाईला यश आलं आहे. त्यांनी दोन्ही समाजांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला.

Curative Petition: क्युरेटिव्ह पिटीशनवरील निकाल कोर्टानं राखून ठेवला

मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटीशनवरील निकाल कोर्टानं राखून ठेवला आहे.

Solapur gadda सोलापुर यात्रेतील भीक मागतानाचा व्हिडीओ समोर, बाल संरक्षण विभागाने घेतली दखल

सोलापुरमधील गड्डा यात्रेत काही लहान मुलांचा अंगाला केमिकलयुक्त रंग लावून भीक मागतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर या व्हिडीओची बाल संरक्षण विभागाने दखल घेतली आहे.

Maratha Reservation: आरक्षण यात्रेचा मार्ग बदलण्याची विनंती जरांगेंनी केली मान्य

Reservation Yatra Route Changed: आरक्षण यात्रेचा मार्ग बदलण्यात यावा, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली होती. ही विनंती मनोज जरांगे यांनी मान्य केली आहे.

Maratha Reservation: जरांगेंच्या मोर्चाच्या मार्गात बदल होण्याची शक्यता

Manoj Jarange Pune:जरांगेंचा मोर्चा पुण्यात दाखल होणार आहे. यावेळी पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांना मार्गात बदल करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा ठरला; 'या' दिवशी जाणार रामलल्लाच्या दर्शनाला

ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीची कल्पनाच होऊ शकत नाही- काँग्रेस

ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीची कल्पनाच होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसनं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी

थोड्याच वेळात मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी होणार आहे. दुपारी १.३५ मिनिटांच्या आसपास न्यायधीशांमधे यावर चर्चा होणार आहे.

'भारत जोडो यात्रे'ला प्रसिद्ध मिळवून दिल्याबद्दल आसामच्या मुख्यमंत्र्याचं आभार - काँग्रेस 

Army News: आसाम रायफल्सच्या जवानाने सहकाऱ्यांवर केला गोळीबार ; ६ जखमी

आसाम रायफल्सच्या एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला, त्यात सहा जण जखमी झाले आणि बुधवारी स्वत:ला गोळी मारून ठार मारले. भारत-म्यानमार सीमेजवळ तैनात आसाम रायफल्स बटालियनमध्ये गोळीबाराची घटना घडली

Railway: दिल्लीत दाट धुक्यामुळे 24 ट्रेन धावतायेत उशिराने

धुके आणि प्रतिकूल हवामानामुळे मंगळवारी दिल्लीमध्ये येणाऱ्या आणी जाणाऱ्या ट्रेन उशीराने धावत आहेत. दिल्लीला जाणाऱ्या सुमारे 24 लांब पल्ल्याच्या गाड्या

महावितरणच्या चुकीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू, कुटुंबाला चार लाखांची मदत जाहीर

रिधोरा शेतशिवारातील महावितरणचे पोल व लोंबकळणाऱ्या तारा धोकादायक अवस्थेत असून, महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर एकत्र येत संताप व्यक्त केला. यामुळे गावात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्याने गोविंदा देवराव कवळकार या ३४ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

Mumbai Maratha Reservation: घाटकोपरमध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला पालिकेकडून सुरुवात

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे वादळ जरांगे पाटलांसह मुंबईच्या दिशेने सरकते आहे. तर राज्य सरकारने ही आता मराठा आरक्षणासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने सोमवार दि 23 पासून मराठंयाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरु केले आहे.

Supriya Sule: सत्यमेव जयते, सत्याच्या विजय नक्की होणार - सुप्रिया सुळे 

सत्यमेव जयते सत्याच्या विजय नक्की होणार. रोहितवर जनतेचं प्रेम आहे. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Rohit Pawar: सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना दिली संविधानाची प्रत  

ईडी चौकशीला सामोरे जाण्याची आधी रोहित पवारांनी सुप्रिया सुळेंचे आशीर्वाद घेतले. यावेळी सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना संविधानाची प्रत दिली.  

Rohit Pawar: रोहित पवारांनी पाया पडून घेतले शरद पवारांचे  आशीर्वाद

रोहित पवारांनी पाया पडून शरद पवारांचे मुंबईच्या पक्ष कार्यालयात आशीर्वाद घेतले.यावेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

Rohit Pawar ED: आम्ही मराठी आहोत, आम्ही घाबरत नाही - रोहित पवार

आम्ही मराठी आहोत आम्ही घाबरत नाही असे रोहित पवार म्हणाले. यावेळी मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

Rohit Pawar:  रोहित पवार राष्ट्रवादी कार्यलयाच्या दिशेने रवाना; ईडी आधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करणार असल्याची दिली प्रतिक्रिया

रोहित पवार राष्ट्रवादी कार्यलयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. ईडी आधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.

Rohit Pawar: शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल; रोहित पवार शरद पवार आणि कार्यकर्त्यांची घेणार भेट

शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले आहेत. हातात बॅनर घेऊन ते घोषणा देत आहेत. रोहित पवार शरद पवार आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत, त्यानंतरच ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत.

Manoj Jarange: जरांगे यांच्या सभेसाठी लोणावळ्यात जय्यत तयारी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे-पाटील लोणावळ्याजवळील वाकसई येथे बुधवारी (ता.२४) मुक्कामी आहेत. तेथे जरांगे-पाटील यांच्या सभेचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या आगमनाचे मावळवासीयांना वेध लागले असून स्वागतास विविध संस्था, संघटना सज्ज झाल्या आहेत.

वाकसई येथील संत तुकाराम पादुका स्थानालगतच्या शिवारात मावळ तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने, युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. सभेला होणारी गर्दी गृहीत धरून जवळपास शंभर एकर जागेत मुक्कामाची; तर अन्य शंभर एकर जागेवर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मावळचे आमदार सुनील शेळके, शिवसेनेचे (ठाकरे गट) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांनी मंगळवारी सभास्थळी भेट देत संयोजकांशी संवाद साधला.

यावेळी आमदार शेळके म्हणाले, ‘‘मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज आहे. सर्व समाजातील बांधवांनी शक्य होईल, त्या पद्धतीने सहकार्य करावे. मावळ तालुक्याने नेहमीच जातीय सलोखा आणि एकोपा जपला आहे. पदयात्रेच्या निमित्ताने तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करणे आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे.’’

Rohit Pawar: आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी; शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शन आणि बॅनरबाजी

आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. तर यावेळी शरद पवार गटाकडून मोठं शक्तिप्रदर्शन आणि बॅनरबाजी करण्यात येत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून कार्यकर्ते आणि त्यांच्या मतदारसंघातील लोक एकत्रित जमले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Rohit Pawar: शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना बारामती ॲग्रो कंपनीप्रकरणात ईडीची नोटीस

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना बारामती ॲग्रो कंपनीप्रकरणात ईडीने नोटीस पाठवली आहे. रोहित पवार हे हॅाटेल ड्रायडंट येथून १०. ३० वाजता ईडी कार्यालयासाठी निघणार आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे ९.४५ वाजता सिल्व्हर ओक येथून पक्ष कार्यालयासाठी निघणार आहेत. शरद पवार १० वाजल्यापासून पक्ष कार्यालयात असतील तर रोहित पवार हे १०.४५ पर्यंत पोहोचतील. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून १० वाजल्यापासून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे.

Ayodhya Ram Temple : राम मंदिराच्या आत आणि बाहेर सुमारे 1000 जवान तैनात - अरुण कुमार तिवारी

अयोध्या, उत्तर प्रदेश : भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. मंदिराच्या आत आणि बाहेर सुमारे 1000 जवान तैनात करण्यात आले आहेत. पुढील काही दिवस हे जवान इथं तैनात असतील, अशी माहिती आरएएफचे डेप्युटी कमांडंट अरुण कुमार तिवारी यांनी दिली.

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आज रोहित पवारांच्या समर्थनात शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

FTII Institute : एफटीआयआय संस्थेत लावण्यात आलेल्या बॅनरप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील एफटीआयआय संस्थेत लावण्यात आलेल्या बॅनरप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एफटीआयआय या संस्थेत "रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन" अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. बॅनर लावल्याप्रकरणी एफटीआयआय संस्थेतील विद्यार्थ्यांवर पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याच बॅनरवरून पुण्यात मोठा वाद निर्माण झाला होता. हे वादग्रस्त बॅनर लावल्या प्रकरणी एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नर्हे गावात तरुणाकडून नागरिकांसह पोलिसांवर सत्तूरने हल्ला

Pune Crime : पुणे : नर्हे गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात एक तरुण परवापासून काल दुपार पर्यंत सत्तूर हत्यार घेऊन फिरत होता. काल अनेक लोकांवर त्याने सत्तूरने हल्ला केला. त्यामध्ये काही पोलीस आणि नागरिक जखमी झाले. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी त्याला दुकानातून ताब्यात घेतलं आहे. राहुल सैफुद्दीन शेख असं तरुणाचं नाव असून त्याच्यावर सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन पोलीस ही जखमी झाले आहेत.

Weather Update : पुढील 24 तासात महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दिल्लीच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात मध्य आणि उत्तर दिल्लीत रिमझिम पावसाची शक्यता आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अयोध्येत पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक

अयोध्या : अयोध्येत सोमवारी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी मंगळवारी भाविकांसाठी राममंदिर खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले आणि तितकेच भाविक मंदिर परिसरात दर्शनाच्या प्रतीक्षेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गर्दीला आवरताना पोलिसांची बरीच दमछाक झाली आणि त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने अयोध्या दौरा करत स्थितीचा आढावा घेतला.

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना 'भारतरत्न' जाहीर

Latest Marathi News Live Update : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर जाहीर करण्यात आला. आज ता. २४ रोजी कर्पूरी ठाकूर यांची १०० वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा सन्मान जाहीर केला. मागासवर्गीयांसाठी काम करणारे नेते म्हणून कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे.

अयोध्येत सोमवारी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी मंगळवारी भाविकांसाठी राममंदिर खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले आणि तितकेच भाविक मंदिर परिसरात दर्शनाच्या प्रतीक्षेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवसेनेने कठीण काळात भाजपला मदत केली. परंतु, तेच शिवसेना संपवायला निघालेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे (ता. महाबळेश्वर) गावच्या यात्रेसाठी साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. शिवाय, राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. मराठा आरक्षणाचाही मुद्दा चांगलाच गाजत आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com