Latest Marathi News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ५ राज्यांचा दौरा ते उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

'जन विश्वास रॅली'साठी बिहारमधील पटणा येथे राहुल गांधी पोहोचले आहेत.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 6 मार्च दरम्यान करणार ५ राज्यांचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 6 मार्च दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. पीएम मोदी ऊर्जा, रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील.

हैदराबादमध्ये पंतप्रधान नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थेचे (CARO) उद्घाटन करतील.

भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील ऐतिहासिक मैलाचा दगड असलेल्या कल्पक्कम, तामिळनाडू येथे भारताच्या स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरच्या कोर लोडिंगच्या प्रारंभाचे साक्षीदार होणार पंतप्रधान.

पंतप्रधान मुझफ्फरपूर-मोतिहारी एलपीजी पाइपलाइनचे उद्घाटन करतील आणि मोतिहारी, बिहार येथे इंडियन ऑइलचा एलपीजी बॉटलिंग प्लांट आणि स्टोरेज टर्मिनल समर्पित करतील.

मोहन नगर औद्योगिक परिसरातील पीव्हीसी दरवाजा बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग

गाझियाबाद : मोहन नगर औद्योगिक परिसरात असलेल्या पीव्हीसी दरवाजा बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

ईव्हीएम घोटाळा केला देशात मोठा असंतोष उसळेल- उद्धव ठाकरे

भाजपविरोधात देशात नाराजी आहे, ईव्हीएम घोटाळा करून ते जिंकलेच तर देशात मोठा असंतोष उसळेल, असा इशारा उद्वव ठाकरेंनी दिला.

परभणीत ९४ मराठा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात?

येत्या लोकसभेसाठी मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात दोनपेक्षा जास्त उमेदवार उभे केले जात आहेत. सरकारच्या निषेध म्हणून हे एक प्रकारचे आंदोलन केले जातेय. परभणी जिल्ह्यामध्ये ९४ मराठा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्याची माहिती आहे.

पंतप्रधान मोदींकडून पक्षासाठी दोन हजार रुपयांचा फंड

पंतप्रधान मोदींनी भाजपसाठी 2000 रुपयांचे योगदान दिले आहे. याद्वारे त्यांनी जनतेला 'राष्ट्र उभारणीसाठी देणगी' देण्याचे आवाहन केले आहे.

आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतो- नवनीत राणा

आम्ही एनडीएसोबत असून आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतो, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळेल आणि त्यांचा भाजपप्रवेश होईल, अशा सध्या चर्चा आहेत.

राज ठाकरे तडकाफडकी मुंबईला रवाना

मनसे कार्यकर्ते बैठकीसाठी उशिरा पोहोचल्याने राज ठाकरे तडकाफडकी मुंबईला रवाना झाले आहेत. पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक आयोजित करण्यात आलेली होती.

Video : धुळ्यात बिबट्याचं डोकं अडकलं भांड्यात; पाच तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाचा यश

एका बिबट्याचं डोकं पाण्याच्या हंड्यामध्ये अडकलं होतं. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाला बिबट्याला सोडवण्यात यश आलं. धुळे जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे.

बिहारच्या मातीत मोठी ताकद आहे, इथे जो निर्णय घेतला जातो त्याचं अनुकरण होतं- यादव

पाटणा येथील गांधी मैदानावर आरजेडीच्या 'जनविश्वास महा रॅली'मध्ये, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारची महती गायली आहे. ते म्हणाले की, बिहारने अनेक महान व्यक्तिमत्त्व दिले आहेत. याच गांधी मैदानात देशातील नेत्यांनी रॅली काढल्या आहेत आणि बैठका घेतल्या आहेत.. इथून संपूर्ण देशाला संदेश गेला. बिहारच्या मतीत इतकी ताकद आहे की बिहार जे निर्णय घेतं त्याचे देशातील लोक अनुकरण करतात. उद्याही तेच होणार आहे."

तिकीट नाकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्याचा राजकारणातून संन्यास

माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे.

"भाजपचा हा पॅटर्नच आहे, ते बिनकामाच्या लोकांना तिकीट देतात..."; आपच्या मंत्री आतिशींनी भाजपवर साधला निशाणा

आम आदमी पक्षाच्या मंत्री आतिशी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, "भाजपचा हा पॅटर्नच आहे, ते बिनकामाच्या लोकांना तिकीट देतात. त्यानंतर पाच वर्षानंतर ते लोकांना म्हणतात की, पक्ष खराब नाहीये केवळ तो एक उमेदवार चुकीचा होता म्हणून आम्ही उमेदवार बदलत आहोत, तुम्ही आम्हाला मत द्या. लोकांना मूर्ख बनवण्याचे काम भाजप करत आहे. यावेळीही त्यांनी याच कारणासाठी आपले चार खासदार बदलले आहेत."

Jan Vishwas Rally: 'जन विश्वास रॅली'साठी बिहारमध्ये पोहोचले राहुल गांधी

Jan Vishwas Rally: मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव,सीपीआय(एम)चे सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांनी बिहारमधील 'जन विश्वास रॅली'च्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

पुणे विभागाच्या एसटी बसेस आता सीएनजीवर

पुणे विभागाच्या एसटी बसेस आता सीएनजीवर चालणार आहेत. पुणे विभागाकडून 500 बसेसच सीएनजीमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. पुणे विभागातील 14 आगारांमधील डिझेल बसेस सीएनजी रूपांतर करण्यात येणार आहे. प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातील 800 बसेस पैकी 500 बसेसच सीएनजीत रूपांतर होणार आहे.

राज ठाकरेंची कार्यालयाला अचानक भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील शहर कार्यालयात दाखल झाले. राज ठाकरे अचानक आल्याने कार्यकर्त्यांची धावपळ झाली. पक्ष कार्यालयात राज ठाकरे विभाग प्रमुखांची बैठक घेणार आहेत. मात्र राज ठाकरे येण्याआधी कार्यालयात कोणीच उपस्थित नाही, त्यामुळे अचानक सर्वांची धावपळ उडाली.

शिर्डीची जागा ठाकरे गटाकडेच! संजय राऊत यांनी दिली माहिती

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच आहे. आम्ही येथे प्रचारास सुरुवात देखील केली आहे. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

गडकरींना तिकीट नाही मात्र कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी मिळाली 

ज्या नितीन गडकरींनी भाजपासाठी काम केले त्यांना तिकीट मिळाले नाही मात्र ज्यांचावर आरोप केले त्या कृपाशंकर सिंह यांना भाजपाने तिकीट दिले असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

Nagpur Vehicle Theft by Painter: घराला रंग लावता-लावता वाहन चोरी करायला लागला; पेंटर अब्दुल सत्तारला अटक

पेंटींगची काम करीत असताना, अधिकचा पैसा कमविण्याच्या नादात वाहनाची चोरी करणाऱ्या ४४ वर्षीय चोरट्याला पोलिसांनी तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. त्याने सात गुन्ह्यांची कबुली दिली. अब्दुल सत्तार वल्द अब्दुल शकुर (वय ४४, रा. वांजरा ले-आउट, यशोधरानगर) असे आरोपीचे नाव आहे.

Loksabha News: तटकरेंना खुले आव्हान; रायगड लोकसभा जिंकून दाखवाच

सुनील तटकरेंना खुले आव्हान आहे, रायगड लोकसभा निवडून दाखवाच, तुमची काय अवस्था होते ती बघा. तर अनिल तटकरे यांनी शरदचंद्र पवार यांना साथ दिली असून मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मला त्याचा लाभ नक्कीच होणार, अनंत गीते म्हणाले

बदलापूर कोच यार्डातील डब्याला आग

बदलापूर कोच यार्डातील डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ठाकरे गटाने डिपॉझिट वाचवून दाखवावं, गुलाबराव पाटलांचं आव्हान

जळगाव लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाने डिपॉझिट वाचवून दाखवाव, असं आव्हान गुलाबराव पाटलांकडून करण्यात आलं आहे.

मनोज जरांगे आज धाराशिव दौऱ्यावर

मनोज जरांगे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. यावेळी ते संवाद बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Chandrapur Crime: चंद्रपुरच्या मौशीमध्ये पतीकडून पत्नी आणि मुलींची हत्या

चंद्रपुरच्या मौशीमध्ये पतीने पत्नी आणि दोन चिमुकलींची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली.

मराठा समाजाला फसवण्याच काम सरकारने केलं, विजय वडेट्टीवारांची टीका

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारने मराठा समाजाला फसवण्याच काम केलं, असं वक्तव्य त्यांनी केलं.

Raj Tackrey Pune: राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

Raj Thackrey Pune Visit: राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

Crime News: जमीन खचल्याने दोन महिन्याच्या बाळासह आईचा झोपेत असताना मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलन होऊन दोन महिन्याच्या बाळासह आई आणि इतर दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. झोपेत असताना त्यांचे घर ढासळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Actor Salman Khan performs: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट प्री-वेडिंग कार्यक्रमात सलमान खान

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट प्री-वेडिंग कार्यक्रमात सलमान खानचा जबरदस्त डान्स केला आहे.

Nashik Farmer: नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा आंदोलनाचा आज सातवा दिवस

नाशिकमध्ये शेतकरी आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. शेतकरी आणि प्रशासनातील चर्चेची फेरी निष्फळ ठरली आहे. शेतकऱ्यांनी जेलभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

BJP Government: डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम

डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

Weather Update : राज्यासह देशात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची हजेरी

राज्यासह देशात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Bharat Jodo Nyay Yatra : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात होणार राहुल गांधींची जाहीर सभा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात धडकणार आहे. दि. 15 आणि 16 मार्चला राहुल गांधी ठाण्यात येतील. यावेळी त्यांची सभादेखील आयोजित करण्यात आलीये. 17 मार्चला दादर चैत्यभूमी इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. 

Delhi Rain : दिल्लीतील हवामानात बदल, सकाळी कोसळल्या पावसाच्या हलक्या सरी

दिल्लीत शनिवारी सकाळीही अचानक हवामानात बदल पहायला मिळाला. दिल्लीतील ग्रेटर कैलास, इंडिया गेट, आरके पुरम आणि जनपथसह अनेक भागात जोरदार वारे आणि हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. भारतीय हवामान खात्यानं (IMD) पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मातंग समाजाच्या हितासाठी सरकार काम करत आहे - चंद्रकांत पाटील

मातंग समाजाच्या हितासाठी सरकार काम करत आहे. आर्टीची घोषणा आपल्या सरकारनं नुकतीच केली आहे. मातंग समाजासाठी हा ऐतिहासिक निर्णय असेल. आरक्षण मिळालं, पण समाज वर आला नाही. समाजातल्या नेत्यांना विनंती करतो की, यासाठी आपण काम करू असं भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

Terrorist Commander : सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका दहशतवाद्याची हत्या

पाकिस्तानातून सलग दोन दिवसांत दोन कट्टर दहशतवाद्यांच्या मृत्यूच्या बातम्या समोर येत आहेत. शनिवारी, पाकिस्तानमधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कमांडरपैकी एक शेख जमील-उर-रेहमान, खैबर पख्तूनख्वामधील अबोटाबाद इथं मृत आढळून आला. रहमान हा युनायटेड जिहाद कौन्सिलचा (UJC) सदस्य होता. तसेच तो काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी होता. ऑक्टोबर 2022 मध्ये गृह मंत्रालयाने त्याला दहशतवादी घोषित केले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Republican Party : अपक्ष निवडणूक लढविणार नाही - भारतीय वंशाच्या निक्की हॅले

वाशिंग्टन : अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या भारतीय वंशाच्या निक्की हॅले (वय ५१) यांच्या प्रचार मोहीम पथकाने फेब्रुवारीमध्ये १.२ कोटी डॉलरची देणगी गोळा केल्याचे जाहीर केले. रिपब्लिकन पक्षाऐवजी अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता त्यांनी फेटाळली.

LokSabha Election BJP Candidate : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तिसऱ्यांदा मैदानात

Latest Marathi News Live Update : भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेत १९५ उमेदवारांची पहिली जम्बो यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या वाराणसीतून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागील महिनाभरात बैठका घेऊन जागा वाटप निश्चित केलेल्या आढाव्याचा अहवाल तिन्ही पक्षांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला आहे. युती-आघाडीच्या कोणी कितीही वावड्या उठवू देत,’ असे सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिलाय. अनेक महिन्यांपासून रखडलेली ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांची पहिली जाहीर सभा आज (ता. ३) रविवारी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर होणार आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com