News Update: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Live Update Maharashtra: देश, विदेश आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

भाजपाच्या बैठकीत महाराष्ट्रातील 'या' नावांवर शिक्कामोर्तब?  

भाजपच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील खालील नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळते आहे.

नागपूर - नितीन गडकरी

जालना - रावसाहेब दानवे

चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार

पुणे - मुरलीधर मोहोळ

सांगली - संजय काका पाटील

भिवंडी - कपिल पाटील

दिंडोरी - भारती पवार

बीड - पंकजा मुंडे

राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ यांना

मुंबई : यंदाच्या जागतिक महिला दिनी (8 मार्च रोजी) जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पटकावला असून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी, सुटीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली आहे.

Nagpur Fire : नागपूरच्या मोमीनपुऱ्यातील बोरियापुरा येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग

नागपूरच्या मोमीनपुऱ्यातील बोरियापुरा येथील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत गोदामात ठेवलेल्या मालासह कार जळून खाक झाली. या गोदामात मोठ्या प्रमाणात टायर आणि इतर माल जळाल्याने आग पसरली. अग्निशमन दला कडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असून अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Maratha Reservation : महाराष्ट्र मराठा आरक्षण आंदोलन हिंसाचाराच्या चौकशीसाठी SIT गठित

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार आरक्षण आंदोलनातील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी SIT गठित करण्यात आली आहे. SIT चे प्रमुख हे संदिप कर्णिक (भापोसे), पोलीस आयुक्त, नाशिक शहर असणार आहेत. या एसआयटीकडून हिंसक घटनांमागे कोण आहे? सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाला का? चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या गेल्या का? याचा शोध घेतला जाणार आहे. तसेच या चौकशीचा अहवाल सादर करण्याची मुदत 3 महिने असणार आहे. तसेच या SIT ला तज्ज्ञांना आमंत्रित करण्याचे आणि आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याचे अधिकार असणार आहेत.

देशात आजच लागू होणार CAA, पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात करू शकतात घोषणा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) आजच देशात लागू केला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे थोड्याच वेळात याबद्दलची घोषणा करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निववडणुकीपूर्वी सीएए लागू केला जाईल असे सांगितले होते.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वेळा महाराष्ट्र केसरी राहिलले कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी पाटील यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला

दिल्ली हायकोर्टाने आपचे आमदार अमानतुल्ला खान यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

दिल्ली उच्च न्यायालयाने आपचे आमदार अमानतुल्ला खान यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावली. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ट्रायल कोर्टाने फेटाळला होता. त्याला ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.


Rahul Gandhi: 'मित्राला लग्नासाठी मुलगी मिळत नाही', राहुल गांधींना पाणी संकट सोडवण्याचं आवाहन

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये जलसंकटाने प्रचंड खळबळ उडाली आहे. भारताची तंत्रज्ञान राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील अनेक जलसाठे उन्हाळ्यापूर्वीच कोरडे पडले आहेत. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना पाण्याचे टँकर घेण्यासाठी जास्त पैसे मोजावा लागत आहे. दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका व्यक्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाणी संकटाची समस्या सोडवण्यासाठी टॅग केले. एवढेच नाही तर त्यामागील व्यक्तीने दिलेल्या कारणामुळे ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Mallikarjun Kharge: भाजपचा संविधान बदलण्याचा हेतू; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका

प्रचंड बहुमत मिळवून त्यांचा (भाजप) संविधान बदलण्याचा मानस आहे...देश स्वतंत्र करण्यात त्यांचे कोणतेही योगदान नाही. तिरंग्यालाही त्यांनी विरोध केला. आजही RSS भगवा ध्वज फडकवतो, राष्ट्रध्वजाला तितकं महत्त्व देत नाही... : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

Omar Abdullah: आम्ही काँग्रेससोबत 3 जागांसाठी तडजोड करण्यास तयार; ओमर अब्दुल्ला यांचा मोठा निर्णय

''आम्ही ठाम असतो, तर आम्ही ममता बॅनर्जींप्रमाणे सर्व 6 जागांवर आमचे उमेदवार जाहीर केले असते... आम्ही 50% जागांवर आमचे उमेदवार उभे करत नाही... ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने जिंकलेली जागाही त्यांच्यासाठी सोडली नाही. आम्ही काँग्रेससोबत 3 जागांसाठी तडजोड करण्यास तयार आहोत...: नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, जम्मू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी ते दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीत हजर राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी ते दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीत हजर राहणार आहेत. Nagpur Crime: अत्याचारानंतर युवतीच्या वडिलांना पाठवला व्हिडीओ, बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांला पळून जाण्याआधीच अटक

अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अश्‍लील व्हिडीओ वडिलांना पाठवून व्हायरल करणाऱ्या बी.कॉम.च्या विद्यार्थ्याला शांतीनगर पोलिसांनी अटक केली. ही धक्कादायक घटना ४ मार्चला दुपारी एक वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड टोलमुक्त ठेवा ; काँग्रेसची मागणी

कोस्टल रोड हा पूर्णपणे टोलमुक्त असला पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षागायकवाड यांनी केली आहे. या आश्वासनपूर्तीसाठी आम्ही सरकारला धारेवर धरू असेही त्यांनी सांगितले

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे दिल्लीला रवाना झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपावर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचं बोललं जातंय.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा दक्षिण भारत दौरा

लोकसभेच्या निवडणुका १५ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १५ ते १९ मार्चदरम्यान दक्षिण भारताचा दौरा असणार आहे. या दरम्यान ते रोड शो करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना फोन करून धमकी दिली असून याप्रकरणी त्यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

दिल्लीतील महायुतीची बैठक रद्द

दिल्लीमध्ये आयोजित केलेली महायुतीची बैठक रद्द करण्यात आलेली असून जागावाटपाचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे.

आमदार निलेश लंके खासदार अमोल कोल्हेंच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेदरम्यान आमदार निलेश लंके शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला दणका! निवडणूक रोख्यांची माहिती १२ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला मोठा दणका दिला आहे. निवडणूक रोख्यांची माहिती १२ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने SBI ची याचिका फेटाळली आहे. निवडणूक रोख्यांची माहिती १२ मार्चपर्यंत निवडणूक आयोगात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचे लोकार्पण

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आलं आहे. मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचे आज लोकार्पण करण्यात आलं.

आधीच्या सरकारने फक्त खोडा घालण्याचं काम केलं- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आधीच्या सरकारने फक्त खोडा घालण्याचं काम केलं आहे. महायुती सरकारच्या काळात कामांना वेग आला आहे. गेल्या पावणे दोन वर्षात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत.

कोस्टल रोडची दुसरी मार्गिकाही लवकरच सुरू होणार - देवेंद्र फडणवीस

कोस्टल रोडची पहिल्या मार्गिकाचे आज लोकार्पण होत आहे. कोस्टल रोडची दुसरी मार्गिकाही लवकरच सुरू होणार आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडी सुटेल. कोस्टल रोडचं काम महायुती सरकारने केलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचे होणार लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेच्या लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी खासदार मिलिंद देवरा, आमदार मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर सदा सरवणकर मंचावर उपस्थित होते.

Sharad Pawar: निवडणुका कधी जाहीर होतील याची वाट पाहतोय- शरद पवार

निवडणुका कधी जाहीर होतील याची वाट पाहतोय, असं शरद पवार म्हणाले आहेत. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक आयुक्ताच्या राजीनाम्याबाबतही त्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

BJP: आज भाजप निवडणूक समितीची दिल्लीत महत्त्वाची बैठक

आज दिल्लीमध्ये भाजप निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आज महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

Cabinet Meeting: आज आणि उद्या मंत्रिमंडळाची बैठक; अनेक महत्त्वाचे निर्णय होणार

आज आणि उद्या मंत्रिमंडलाची बैठक बोलावण्यात आली आहे. पहिल्यांदाच सलग दोन दिवस बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी अनेक जीआर काढले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन; वरळी-मरिन ड्राईव्ह प्रवास होणार सोपा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कोस्टल रोडचे उद्घाटन केले जाणार आहे. यामुळे वरळी-मरिन ड्राईव्ह बीच दरम्यानचा प्रवास सूकर होणार आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री उपस्थित असतील. उबाठा नेते आदित्य ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहतील का हे पाहावं लागेल.

Sharad Pawar: शरद पवारांची आज पुण्यात पत्रकार परिषद

'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार सोमवार दि. ११ मार्च २०२४ रोजी सकाळी ०९.४५ वाजता पुणे येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. मोदी बाग येथील कार्यालय, शिवाजी नगर, पुणे येथे पत्रकार परिषद होईल.

 Oscar winner List: सिलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले ख्रिस्तोफर नोलन; वाचा ऑस्कर विजेत्यांची नावं

ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे

संपूर्ण यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणूक रोख्यांची माहिती देण्यास विलंब होणार असल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टाला सांगितलं होतं. याप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. याकडे देशाचं लक्ष असेल. आज ऑस्कर विजेत्यांची नावे जाहीर झाली आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. भाजप लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com