News Update: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जीपला अपघात, 1 जवान ठार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय. या विरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जीपला अपघात, 1 जवान ठार

एनडी उमेदवारांच्या विजयासाठी ३०० खास कार्यकर्ते काम करणार - तावडे

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मी निवडणूक आयोगाच्या घटनेचा आधार घेतला - नार्वेकर

ठाकरे गटाच्या माझा कृत्यातून काही घटनाबाह्य झालेलं होतं का हे दाखवलं जाईल असं मला वाटलं. मात्र तिथे राजकिय भाषण व शिवीगाळ या पलिकडे काही झालेलं नाही. १ सुप्रीम कोर्टाने उपाध्यक्षांनी २१ जून रोजी अध्यक्षांनी अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता दिली नाही व गोगावले व शिंदेंच्या नियुक्तीला मान्यता दिली.

अध्यक्षानी १९९९ ची घटना योग्य ठरवली व २०१८ ची घटना अयोग्य ठरवली असा आरोप होत आहे. यावर नार्वेकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाने मूळ राजकिय कोणता हे ठरवताना दोन्ही गटाने घटना सादर केली तर निवडणूक आयोगाकडे जी घटना आहे त्याचा आधार घ्या असं म्हटलयं. मी त्यानुसार निवडणूक आयोगाच्या घटनेचा आधार घेत निर्णय दिला.

ठाकरेंच्या जनता न्यायालयानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड केली. यानंतर राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद नाही तर दसरा मेळावा असल्याचे म्हटले आहे.

शिंदे, नार्वेकरांनी विना सुरक्षा यावं, मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा

सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर 100 टक्के निकाल आपल्याबाजूने लागणार- अनिल परब

2013 आणि 2018 च्या निवडणुकीचे पत्र देऊन ही निवडणूक आयोगाने 1999 च्या नंतरचे पुरावे नसल्याचे निवडणूक आयोग म्हणत आहे. आता पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर 100 टक्के निकाल आपल्याबाजूने लागणार, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाने केलेल्या पत्रव्यवहारात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख

२०१८ ला 3 संघटनात्मक ठराव मंजूर करण्यात आले होते. अनिल देसाई यांनी मोठे ठराव मांडले. बाळकृष्ण जोशी यांची निवड करण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांचा युवासेना प्रमुख रामदास कदम यांनी मांडला होता. १०१८ ते २०२२ निवडणूक आयोगाने पत्रव्यवहार केला होता. पत्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख होता.

शिवसेनेने केलेले ५ ठराव अनिल परबांनी वाचून दाखवले

शिवसेनेने केलेले ५ ठराव अनिल परब यांनी वाचून दाखवले

शिंदेंच्या आमदारांना कायद्याचे संरक्षण नाही ते अपात्र- असीम सरोदे

एकनाथ शिंदे गटातील आमदारांना कायद्याते संरक्षण नाही ते अपात्र आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सहीने एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायालयाने भरत गोगानले यांची नियुक्ती देखील बेरायदेशीर ठरवली, असीम सरोदे यांची माहिती.

नामिबियातील चित्ता शौर्य याचे निधन

आज 16 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3:17 च्या सुमारास नामिबियातील चित्ता शौर्य याचे निधन झाले... शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल, अशी माहिती सिंह प्रकल्पाच्या संचालकांनी दिली.

राहुल नार्वेकरांच्या लवादाने निर्णय दिल्यानंतर अंत्ययात्रा निघाल्या - संजय राऊत

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या निकालानंतर आज ठाकरे गटाने जनता न्यायालयाच्या आयोजन केले. यावेळी संजय राऊत म्हणाले, आज जनता न्यायाधीश आहे.राहुल नार्वेकर यांच्या लवादाने निर्णय दिल्यानंतर लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या. लवादाने चोर आणि लफंग्यांच्या हाती शिवसेना दिली लवादाची बायको देखील हा निर्णय मान्य करणार नाही. आमच्यात हिम्मत आहे म्हणून आम्ही जनते न्यायालयात आलो आहोत. या न्यायालयात जो निकाल जनता देईव तोच निकाल लोकसभा आणि विधानसभेत लागेल. सत्याची हत्या झालीय असीम सरोदे या लढ्यात सुरुवातीपासून आहेत. लवादला मोतीबिंदू झाला असेल म्हणून त्यांना काही पुरावे दिसले नसतील. 

Uddhav Thackeray : महापत्रकार परिषदेला उद्धव ठाकरेंचं आगमन

आपल्या महापत्रकार परिषदेला उद्धव ठाकरेंचं आगमन झालं आहे. थोड्याच वेळात ही परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येत रामजन्मभूमी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येत होणाऱ्या रामजन्मभूमी सोहळ्याच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जे निवडक यजमान आहेत ते शरयू नदीच्या तीरावर प्रायश्चित्त घेणार आहेत आणि त्यानंतर कलश यात्रेला सुरुवात करणार आहेत.

Patna Schools : थंडीच्या लाटेमुळे बिहारमधील शाळा बंद

उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर बिहारच्या पाटणामधील आठवीपर्यंतच्या सर्व शाळा 20 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत.

Ayodhya Ram Mandir : शरयू नदीच्या पाण्याने उद्या रामलल्लांचा अभिषेक

आयोध्यात होणाऱ्या रामजन्मभूमी सोहळ्याच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आज राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जे निवडक यजमान आहेत ते शरयू नदीच्या तीरावर प्रायश्चित्त घेणार आहेत. त्यानंतर कलश यात्रेला सुरुवात होईल. उद्या शरयू नदीच्या पाण्याने रामलल्लांचा अभिषेक होणार आहे.

संजय सिंह बॅकफूटवर, WFI क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही

बृजभूषण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंह बॅकफूटवर आले आहेत. WFI क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सूत्रांनी सांगितले की, WFI क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही.

Rahul Gandhi: राम मंदिर पीएम मोदींचा राजकीय कार्यक्रम- राहुल गांधी 

राम मंदिराच्या सोहळ्या संदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, एक प्रकारे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय कार्यक्रम बनवण्यात आला आहे.

Uddhav Thackrey PC:उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर केसरकरांची टीका

Dipak Kesarkar: उद्धव ठाकरेंकडून महापत्रकार परिषदेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. केसरकर म्हणाले की हा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.

Sharad Mohol Murder Case: शरद मोहोळ खून प्रकरण, २४ जणांवर कारवाई

शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत २४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Sharad Mohol Murder Case: शरद मोहोळ खून प्रकरण, आज ११ आरोपींना कोर्टात हजर करणार

Sharad Mohol Murder Case: शरद मोहोळ खून प्रकरणातील सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Manoj Jarange: माझ्यावर मोठा ट्रॅप लावला जातोय-मनोज जरांगे

Maratha Reservation: २० जानेवारीला मुंबईत आंदोलनाचा इशारा देणारे मनोज जरांगे सरकारबद्दल म्हणाले की, "सरकार मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार खुप मोठं षडयंत्र रचणार आहे."

कुर्ल्याच्या न्यू रोड या ठिकाणी लागली आग

न्यू रोड, कुर्ला या ठिकाणी आग लागली असून, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दुपारी ४ वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

काही दिवसांपुर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रतेचा निकाल देण्यात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून दुपारी ४ वाजता महापत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

 जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही; वरिष्ठ मंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली - मनोज जरंगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही, राज्य सरकारकडून जरंगे यांची समजूत काढण्यासठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती सरकार मधील वरिष्ठ मंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबई देण्याची वेळ येणार नाही, राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगे यांच्या आंदोलनावर बारीक लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.

वंदे भारत रेल्वेत असनगाव स्टेशनवर बिघाड

जालना मुंबई वंदे भारत रेल्वे गाजीत असनगाव येथे बिघाड झाला आहे. या स्टेशनवर गाडी अडकून पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विजेच्या तारेवर अडकलेल्या पक्ष्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्याचा मृत्यू

अहमदाबादच्या घुमा भागात विजेच्या तारेवर अडकलेल्या काही पक्ष्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असताना एका अग्निशमन अधिकाऱ्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे, अहमदाबाद अग्निशमन विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे.

Andhra Pradesh Congress : आंध्रप्रदेशमध्ये भाऊ-बहिण आमने सामने

आंध्रप्रदेशमध्ये भाऊ बहिण आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला रेड्डी यांनी नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता, आता शर्मिला रेड्डी यांना आंध्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आले आहे. विद्यमान अध्यक्ष रूद्र राजू यांनी राजीनामा दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

शर्मिला रेड्डी यांनी वाईएसआर तेलंगाना पार्टी कॉंग्रेसमध्ये विलय केला आहे. वाय एस जगनमोहन रेड्डी कारागृहात असताना पक्षाची कमान सांभाळण्याचं काम शर्मिला रेड्डी यांनी केलं होतं. शर्मिला रेड्डी यांना सोबत घेत कॉंग्रेस दक्षिणेत आपले लक्ष केंद्रीत करत असल्याचं दिसून येत आहे. सध्या आंध्रप्रदेशमध्ये काँग्रेसची 1.7 % टक्के मत आहेत.

मुंबई मेट्रो सेवा कोलमडली

आज सकाळी नागरिक कामाच्या ठिकाणी पोहचण्याच्या घाईत असताना मुंबई मेट्रो सेवा कोलमडल्याचे पाहायला मिळाले. दहिसर ते कांदिवली दरम्यान गाड्या अडकल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील सेवा प्रभावित झाली. मागील तासभारापासून मेट्रो सेवा बंद असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

ED Raids : मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचे राजस्थानमध्ये छापे

अंमलबजावणी संचालनालया (ED)ने राजस्थानमध्ये सहाहून अधिक ठिकाणी कारवाई केला आहे. केंद्राच्या 'जल जीवन मिशन'च्या अंमलबजावणीसाठी मनी लाँड्रिंग झाल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

PM Narendra Modi: राज्यातील नेते दिल्लीत दाखल; पंतप्रधान मोदींसोबत बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

: जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचा ३.६ तीव्रतेचा धक्का

जम्मू-काश्मीरमध्ये ३.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांना का धक्का जाणवला.

Corona Update: कोरोनामुळे गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई, पुणे आणि सांगलीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Devendra Fadanvis: उबाठा गटाकडून हिंदूंचा अपमान- देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केलंय की, प्राणप्रतिष्ठा होत असताना देशातील सर्व मंदिराची स्वच्छता व्हावी. त्यामुळे आम्ही मुंबादेवी येथे येऊन स्वच्छता केली आहे. हा खूप चांगला उपक्रम आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उबाठा गट हिंदूंचा अपमान करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Rajnath Singh: राजनाथ सिंहांकडून हनुमान सेतू मंदिराची स्वच्छता; पाहा व्हिडिओ

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील लखनोच्या हनुमान सेतू मंदिराची स्वच्छता केली. यासंदर्भात एएनआयने व्हिडिओ शेअर केला आहे.

Rajnath Singh : संरक्षण मंत्र्यांनी केली हनुमान सेतू मंदिर परिसराची स्वच्छता

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील हनुमान सेतू मंदिर परिसराची स्वच्छता केली.

अयोध्येत आजपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास होणार प्रारंभ 

आजपासून अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम प्रायश्चित्त पूजनाने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल. ही पूजा पद्धत सकाळी 9:30 पासून सुरू होईल, जी पुढील 5 तास चालेल.

Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन करणार ED ला सहकार्य

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 20 जानेवारीला अंमलबजावणी संचालनालय करत असलेल्या चौकशीसाठी सहमती दर्शवलीये. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या 8 व्या समन्सला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी एजन्सीला पत्र लिहिले की, ते 20 जानेवारी रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करू शकतात.

Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आज निपाणी दौऱ्यावर

निपाणी : माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आज, मंगळवारी (ता. १६) निपाणीत येत आहेत. त्यांच्या हस्ते सहकाररत्न रावसाहेब पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांचा नागरी सत्कार, तालुक्यातील उत्तम पाटील गटाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार, कार्यकर्ता मेळावा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले आहे. येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

महंत शांतिगिरीजी महाराज यांना श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण

दहिवडी : मलवडी (ता. माण) येथील महंत श्री शांतिगिरीजी महाराज यांना २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. महंत श्री शांतिगिरीजी महाराज गेली अनेक वर्षे जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून धार्मिक, महाराजांना श्रीराम मंदिर शिलान्या व संपूर्ण कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. श्रीराम मंदिरासाठी महाराजांनी पन्नास लाख रुपये देणगी दिलेली आहे.

International Airport : लखनौच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 17 उड्डाणे रद्द

कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे विमाने आणि गाड्या चालवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. उत्तर भारतात सततची थंडी आणि धुक्यामुळे लखनौच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 17 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Karul Ghat : करुळ घाट 22 पासून बंद राहणार

वैभववाडी : काँक्रिटीकरणाच्या कामासाठी करुळ घाटमार्ग सोमवार (ता.२२) पासून बंद ठेवण्यास सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. घाटमार्ग ३१ मार्चपर्यंत पूर्ण बंद राहणार आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Latest Marathi News Live Update : ठाकरे गट पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय. या विरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झालीये. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत या यात्रेचा समारोप होईल. अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून या सोहळ्याला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याचबरोबर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजत असून मनोज जरांगे-पाटील मुंबईमध्ये 20 जानेवारीला आंदोलन करणार आहेत. देशभरात पुन्हा कोरोना विषाणूने थैमान माजवल्याने अनेक लोक आजारी पडत आहेत. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com