Latest Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.
Live Update
Live UpdateEsakal

मुंबईतील बोटमध्ये गॅस गळती झाल्याने दोघांचा मृत्यू

मासेमारी करणाऱ्या बोटमध्ये गॅस गळतीमुळे दोघांचा मृत्यू झालाय, तर ४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

पंतप्रधान मोदींचा सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सला फोन

पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बीन सलमान यांना फोन केला आहे. दोन्ही देशाच्या द्विपक्षीय संबंधांबाबत यावेळी चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.

इस्त्राइल दुतवासाबाहेर स्फोट झाल्याचा पोलिसांना फोन

दिल्लीतील इस्त्राइल दुतवासाबाहेर स्फोट झाल्याचा पोलिसांना फोन आला आहे. दिल्ली पोलिसांकडून याची चौकशी सुरु आहे.

नवाब मलिक अजित पवारांच्या भेटीला

नवाब मलिक अजित पवारांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर आले आहेत. भेटीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरणात आरोपीवर २० जानेवारीपासून खटला चालणार

जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरणात आरोपी चेतन सिंह याच्याविरोधात २० जानेवारीपासून खटला चालणार आहे. चेतन सिंहने रेल्वेमध्ये प्रवाशांवर गोळीबार केला होता.

सुनिल केदार यांच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद संपला

सुनिल केदार यांच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद संपला आहे. उद्या याबाबत निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.

जपानच्या कोयासान विद्यापीठाकडून फडणवीसांना डॉक्टरेट पदवी प्रदान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासान विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, दिक्षाभूमीच्या प्रदेशातून येत असल्याचा मला अभिमान आहे. जपान आणि भारताचे संबंध जवळचे आहेत.

Latest Live Update : शत्रूंना पाताळातूनही शोधून काढू; राजनाथ सिंह

INS इंफाळ युद्धनौका मंगळवारी भारतीय नौदलात सहभागी झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुंबई डॉकयार्डमध्ये इंफाळ युद्धनौकेचे उद्घाटन केले.राजनाथ सिंग यावेळी म्हणाले की, अरबी समुद्रात एमव्ही चेम प्लुटो आणि लाल समूद्रात साई बाबा व्यावसायिक जहाजावर हल्ला करणाऱ्या शत्रूंना समुद्राच्या खोल तळातून देखील आपण शोधू काढू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करु.

पंतप्रधान मोदी २७ डिसेंबरला विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान मोदी २७ डिसेंबरला विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

MiG-29K फायटर एअरक्राफ्टचे टायर फुटले; गोव्यातील हवाई दलाच्या तळावरील घटना

MiG-29K फायटर एअरक्राफ्टचे टायर फुटल्याची घटना घडली. गोव्यातील हवाई दलाच्या तळावर अपघात घडला.

अमरावतीत आदिवासी कोळी समाज आक्रमक

अमरावतीत आदिवासी कोळी समाज विविध मागण्यांसाठी आक्रमक झाला आहे. समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

शिर्डीच्या साई मंदिरात 'नो मास्क नो दर्शन'

शिर्डीच्या साई मंदिरात आता 'नो मास्क नो दर्शन'च्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

देशात 25 डिसेंबरपर्यंत JN.1 कोरोना रुग्णांची संख्या 69 वर

२५ डिसेंबरपर्यंत देशात ६९ जेएन.१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशात नव्या व्हेरियंटच्या कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहेत.

रोहित पवारांची सुजय विखेंच्या साखर वाटपावर टीका

आमदार रोहित पवार यांनी खासदार सुजय विखे यांच्या साखर वाटपाच्या योजनेवर टीका केलीआहे, ते म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून साखर पेरणी"

ऊसतोड मजूरांच्या आंदोलनात सहभागी होणार पंकजा मुंडे

पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

'मी एकटा नाही...', छगन भुजबळ यांचे वक्तव्य

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "मी एकटा नाही. माझ्यासोबत अनेक नेते आहेत. "

आयएनएस इम्फाळ नौदलात सामील

आयएनएस इम्फाळ ही युद्धनौका देशाच्या नौदलात सामील झाली आहे. मुंबईमध्ये याची अधिकृत घोषणा करण्यात आली. याप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत.

भारत वि. आफ्रिका - टॉस ढकलला पुढे

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याचा टॉस पुढे ढकलण्यात आला आहे. खेळपट्टी अजूनही ओली असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

दिल्लीला जाणाऱ्या 12 विमानांची दिशा बदलली

दिल्ली विमानतळावर खराब हवामान असल्यामुळे तिथे उतरणाऱ्या 11 विमानांना जयपूरकडे वळवण्यात आलं आहे. तसंच एका विमानाला लखनऊकडे वळवण्यात आलं आहे. विमानतळावरील सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

अमित शाहांची गुरुद्वाराला भेट

आज संपूर्ण देशभरात वीर बाल दिवस साजरा केला जातो आहे. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कोलकाता येथील गुरुद्वारा बारा सिख संगत याठिकाणी भेट दिली.

बंगळुरूमध्ये 100 ई-बसेसचं अनावरण

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बंगळुरूमध्ये 100 नव्या इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी या बसमध्ये प्रवास देखील केला.

3-4 दिवस देशातील अनेक ठिकणी धुके कायम राहण्याची शक्यता - IMD

पुढील 3-4 दिवसांत उत्तर-पश्चिम तसेच लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट ते दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील भीषण रस्ता अपघातात चार जण ठार

मध्य प्रदेशातील गुनाजवळ एका भीषण रस्ता अपघातात चार जण ठार झाले आहेत. या घटनेनंतर उलटलेल्या ट्रकचा व्हिडीओ समोर आला आहे. याबद्दल अधिकची माहिती अद्याप मिळालेली नाहीये.

अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आव्हान दिल्यानंतर आज अमोल कोल्हे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. उद्यापासून काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रेश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे कोल्हे यांनी सांगितले. उद्याच्या मोर्चासाठी शरद पवारांचं मार्गदर्शन घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वरमध्ये आढळला JN.1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  

नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये १ JN.1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली असून कामाला लागली आहे. सध्या संशयित महिलेवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Accident New: संगमनेरमध्ये ST महामंडळाची बस उलटली; विद्यार्थी जखमी

संगमनेरमधून एक्सेल तुटल्याने राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी एसटी महामंडळाची बस उलटली आहे. पिंपरणे गावाजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही शाळकरी विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

Ajit Pawar: खासदार अमोल कोल्हेंच्या मतदार संघात भल्यापहाटे अजित पवारांची पाहणी

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना चॅलेंज दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवारी) पहाटे शिरूर लोकसभा मतदारसंघाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विकासकामांचा देखील आढावा घेतला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आम्ही आमचा निर्णय घेणार, शिरूरबाबत मी जे बोललो तेच फायनल, असं ठाम मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. काल दिलेल्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्यासोबत काही संबंध नाही. माझा दौरा नियोजित होता, असंही अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभेतील गोंधळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार अमोल कोल्हे यांचे देखील निलंबन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. सावित्रीबाई फुले आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन देखील पवारांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री पवार ५० वी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३ उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावणार आहेत.

मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच विजय होईल - मुश्रीफ

कोल्हापूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच विजय होईल. अजून आचारसंहिता नाही तरीही सर्व्हे होतात. त्याला काहीच अर्थ नाही’, असेही मुश्रीफ यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर दिले.

मक्याचे कणीस सोलण्याच्या यंत्राला पेटंट

पुणे : मक्याच्या कणसाची साल काढून दाणे सोलण्याची प्रक्रिया तशी वेळखाऊच, मात्र व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया सुलभ होणार आहे. त्यासाठी ‘जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालया’च्या विद्यार्थ्यांनी यंत्र तयार केले आहे. इतकेच नव्हे तर या कॉर्न पीलिंग मशिनचे पेटंटही मिळविले आहे. त्यामुळे त्याचा राज्यातच नव्हे तर देशातही उपयोग होऊ शकेल.

अणुऊर्जेवर चालणाऱ्या जहाजाला आग

मॉस्को : रशियामधील मुर्मान्स्कच्या उत्तरेकडील एका बंदरावरील अणुऊर्जेवर चालणाऱ्या जहाजाला आणि बर्फ तोडणाऱ्या यंत्रणेमध्ये आग लागल्याची माहिती रशियाच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने दिली. रविवारी रात्री उशिरा ही आग लागल्याचे सांगण्यात आले. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आग लागल्याचे तत्काळ लक्षात आल्याने तासाभरात ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान या आगीमागील कारण मात्र या निवेदनात सांगण्यात आलेले नाही. या दुर्घटनेमध्ये कोणीही जीवित हानी झालेली नाही, असे रशियाने स्पष्ट केले आहे.

हाफीज सईदचा पक्ष निवडणूक लढविणार

लाहोर : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचा पक्ष पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुतांश जागांवर उमेदवार उभे करणार आहे. सईद याने स्थापन केलेल्या मरकझी इस्लामिक मुस्लिम लीग (पीएमएमएल) या राजकीय पक्षाच्या वतीने नुकतीच याबाबत घोषणा करण्यात आली. पाकिस्तानला इस्लामी कल्याणकारी राष्ट्र बनविण्याचे ध्येय असल्याचा दावा ‘पीएमएमएल’ने केला आहे.

नव्या कायद्यांना राष्ट्रपतींची मंजुरी

नवी दिल्ली : संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या तीन नव्या फौजदारी न्याय विधेयकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली. भारतीय दंड संहिता, गुन्हेगारी प्रक्रिया आणि भारतीय पुरावे कायदा १८७२ यांची जागा आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा या नव्या कायद्यांनी घेतली आहे.

सातारकरांचे ‘धन्वंतरी’ डॉ. अनंत साठे यांचे निधन

सातारा : साताऱ्याचे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनंत श्रीधर साठे (वय ७४) यांचे काल निधन झाले. सातारकरांना ते बाबा साठे या नावाने परिचित होते. साताऱ्याचे धन्वंतरी म्हणून त्यांची ओळख होती. प्रत्येक रुग्णाची हसतमुखपणे विचारपूस, चौकशी करणारा डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती.

Live Update
Dr. Anant Sathe : गोरगरीब शेतकऱ्यांचा 'देवमाणूस' हरपला! सातारकरांचे 'धन्वंतरी' डॉ. अनंत साठे यांचं निधन

मराठा नेते मनोज जरांगेंनी नाकारला 'नऊ'चा फॉर्म्युला

छत्रपती संभाजीनगर : ‘ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. त्यात मराठा समाजाला नऊ टक्के आरक्षण द्यावे, नऊ टक्के भटक्या जमातींसाठी तर नऊ टक्के बारा बलुतेदारांसाठी’ असा फॉर्म्युला माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सोमवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडला. जरांगे यांनी हा ‘फॉम्युला’ अमान्य केला आहे.

Live Update
माजी खासदार राठोडांनी मांडलेला 'नऊ'चा फॉर्म्युला जरांगेंनी नाकारला; नेमकं काय आहे फॉर्म्युल्यात?

देशभरात कोरोना रुग्णांत मोठी वाढ

Latest Marathi News Live Update : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा देत 20 जानेवारीपासून आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच देशभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. संपूर्ण देशात थंडीही जाणवू लागली आहे. त्याचबरोबर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि एनडीए कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा करु शकतात. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com