
Archana Tiwari Case: घरच्यांनी ठरवलेल्या तरुणासोबत लग्न करायचं नसल्यानं बेपत्ता झालेल्या तरुणीचा १३ दिवसांनी शोध लागला. मध्य प्रदेशातील वकील तरुणीला न्यायाधीश व्हायचं होतं. पण घरच्यांनी लग्न एका सरकारी नोकरी करणाऱ्या तरुणाशी ठरवलं. शिक्षण होतच राहील, पण आता लग्न कर असा तगादा लावला होता. शेवटी स्वत:च्या बेपत्ता होण्याचा प्लॅन तरुणीने आखला. १२ दिवस पोलिसांसमोर तपासाचं आव्हान होतं. मात्र शेवटी नेपाळ सीमेवरून तिला ताब्यात घेण्यात आलं.