ब्रह्मांडात केवळ माणूसच एकमेव प्राणी नाही, इतर ग्रहांवरही जीवसृष्टी; 'नासा'च्या माजी शास्त्रज्ञांचा दावा | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anita sengupta

ब्रह्मांडात केवळ माणूसच एकमेव प्राणी नाही, इतर ग्रहांवरही जीवसृष्टी; 'नासा'च्या माजी शास्त्रज्ञांचा दावा

नवी दिल्ली - ब्रह्मांडात केवळ माणूसच एकमेव प्राणी नाही, इतर ग्रहांवरही जीवसृष्टीच्या खुणा असल्याचा 'नासा'च्या क्युरिओसिटी रोव्हरच्या लँडिंगसाठी पॅराशूट मॉड्यूल विकसित करणाऱ्या नासाच्या माजी शास्त्रज्ञ आणि एअरोस्पेस इंजिनिअर डॉ. अनिता सेनगुप्ता यांनी दावा केला. मंगळावर रोव्हर उतरवण्याचा रोमांचही त्यांनी सांगितला.

डॉ. सेनगुप्ता म्हणाल्या की, तो क्षण सर्वात भीतीदायक आणि रोमांचक होता. सात मिनिटं खूप भीतीदायक असतात. आम्ही मिशनची टेलिमेट्री पाहत होतो. आम्ही प्रत्येक पॅरामीटरवर लक्ष ठेवून होतो. पॅराशूट विकसित करणे ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी संधी होती.

वयाच्या सहाव्या वर्षी तुम्हाला शास्त्रज्ञ व्हावस कसं वाटलं? त्यावर उत्तर देताना डॉ. सेनगुप्ता म्हणाल्या की, मी स्टारट्रेक पाहिला होता. माझे वडील इंजिनिअर होते. मग मी त्यांला सांगितले की मला खगोलभौतिकशास्त्रज्ञ व्हायचे आहे.

लोकांना मंगळावर का जायचे आहे? या प्रश्नावर डॉ. अनिता सेनगुप्ता म्हणाल्या की, माणसाचा स्वभावातच शोध घेण्याची प्रवृत्ती आहे. माणुस समुद्रात जातो. वाळवंटाचा शोध घेतो. आपल्याला मंगळावर जायचे आहे, कारण आपल्याला तेथे स्थायिक व्हायचे आहे. मानवाला त्याचा शोध घेण्याचा स्वभावच पुढे घेऊन जातो. शिवाय आपल्याला इतर ग्रहांवर जीवन शोधावे लागेल, असही डॉ. सेनगुप्ता यांनी सांगितलं.

टॅग्स :indian scientistNASA