Youngest Organ Donor: चार दिवसांचं बाळं बनलं भारतातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता; ६ जणांचे वाचवले प्राण

सुरत इथल्या या बाळाच्या पालकांचं सर्वत्र कौतुक होतं आहे.
organ donor
organ donor

Youngest Organ Donor: मानवी अवयव तयार करता येत नाहीत, त्यामुळं गरजवंतांला एखाद्या दात्याकडून अवयव मिळणं हे सर्वात मोठं दान समजलं जातं. पण अशाच प्रकारे केवळ ४ दिवसांच्या बाळानं अवयवदान करत ६ जणांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळं या बाळाची भारतातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता म्हणून नोंद झाली आहे.

ब्रेन डेड झाल्यामुळं या बाळाचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या पालकांनी अवयवदानाचं सर्वात श्रेष्ठ काम केलं आहे. या अवयवदानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. (Little hero four day old baby becomes Youngest Organ Donor In India saves lives of six)

organ donor
Maratha Reservation: मराठा तरुणाच्या आत्महत्येवर जरांगेंची प्रतिक्रिया; सरकारला दिला अल्टिमेटम

'हे' अवयव केले दान

गुजरातच्या सूरतमधील हे बाळ असून जन्मानंतर केवळ चारच दिवसात या बाळाचं दुर्देवी मृत्यू झाला. ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी घोषीत केलं, पण त्यानंतर १११ तासांत या नवजात बाळानं इतर सहा बालकांना नव जीवन दिलं आहे. दोन किडनी, लिव्हर आणि डोळे दान करण्याचा सर्वात धाडसी निर्णय त्याच्या पालकांनी घेतला. या पालकांची ही कृती भरतातील अवयवदानाच्या चळवळीसाठी एक मैलाचा दगड ठरली आहे. (Latest Marathi News)

organ donor
Prithviraj Chavan: "बोरवणकरांचा गैरसमज झाला असावा"; आधीच्या विधानावरुन पृथ्वीराज चव्हाणांचा यूटर्न

अवयवदान क्षेत्रात सूरत अव्वल

अवयवदानाच्या क्षेत्रात सूरत शहरानं अनेक गोष्टींसाठी चांगला पुढाकार घेतला आहे. पण आता ही नुकतीच घडलेली घटना एक विशेष आणि प्रेरणादायी बाब आहे. या बालकाचे पालक हे सूरतच्या वलक पाटीया इथले रहिवासी आहेत. मूळचे ते अमरेली येथील आहेत.

जन्म झाल्यापासून बाळ रडत नव्हतं तसेच त्याची हालचालही होत नव्हती. यानंतर डॉक्टरांशी सल्लामसलत करुन त्यांनी अखेर आपल्या बाळाचे अवयव इतर गरजू बाळांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला. (Marathi Tajya Batmya)

organ donor
Lalit Patil Drugs Case: ललित पाटीलवर होणार मोक्का अतंर्गत कारवाई? पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

बाळाबाबत नेमकं काय घडलं?

१३ ऑक्टोबर रोजी हर्षभाई आणि चेनबेन संघानी या दाम्पत्याला बाळ झालं. पण जन्मापासूनच हे बाळ इतर नवजात बाळांप्रमाणं नव्हतं. बाळाची कसलीच हालचाल होत नव्हती तसेच ते रडतही नव्हतं.

यानंतर या बाळाच्या अनेक तपासण्या करण्याचं ठरलं. त्याला व्हेंटिलेटरवर ठेऊन विशेष वैद्यकीय ट्रिटमेंट दिली गेली, कारण ते बरं होऊ शकेल. पण बाळाच्या मेंदूच्या काही चाचण्या केल्यानंतर हे स्पष्ट झालं की, बाळ ब्रेनडेड झालं आहे.

पण केवळ पाच दिवस जगू शकलेल्या आपल्या बाळामुळं इतर सहा बाळांना नवजीवन मिळू शकतं हे कळाल्यानंतर त्यांनी बाळाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com