जिद्दीला सलाम: बाबा, काळजी न करता बसा म्हणाली अन्...

वृत्तसंस्था
Wednesday, 20 May 2020

लॉकडाऊनमुळे जवळचे पैसे संपले. घरी जायला साधन नाही अशा परिस्थितीत एक सायकल खरेदी केली. जखमी वडिलांना सायकलवर बसवले आणि मुलीने तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास करून घर गाठले.

गुरुग्राम (हरियाणा): लॉकडाऊनमुळे जवळचे पैसे संपले. घरी जायला साधन नाही अशा परिस्थितीत एक सायकल खरेदी केली. जखमी वडिलांना सायकलवर बसवले आणि मुलीने तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास करून घर गाठले. पण, ही मुलगी अवघी 15 वर्षाची असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मनाने श्रीमंत असलेल्या भिकाऱयाची दानत मोठी...

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, रोजगार बंद झाल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसतात. काळीज पिळवटावून टाकणारे व्हिडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, असेच एक छायाचित्र व्हायरल झाले आहे. या छायाचित्रामध्ये 15 वर्षांची मुलगी आपल्या जखमी वडिलांना सायकलवरून घरी घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

...म्हणून चोरली सायकल; माफीनामा व्हायरल

पंधरा वर्षाच्या मुलीने गुरुग्राम ते बिहार असा सायकलवरून प्रवास केला आहे. तब्बल 1200 किलोमीटर वडिलांना सायकलवर बसून डबलशीट प्रवास करणाऱया मुलीचे नाव आहे ज्योती कुमारी. ज्योतीच्या जिद्दिला नेटिझन्सनी सलाम ठोकला आहे. ज्योती इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. तर वडील गुरुग्राममध्ये ई-रिक्षा चालवायचे. पण, लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाला आणि ई-रिक्षा मालकाकडे जमा करावी लागली. जवळील पैसे संपल्यामुळे घर मालकानेही घर खाली करण्यासाठी दबाव टाकला. राहण्यासाठी घर नव्हते आणि  खाण्यासाठी पैसे शिल्लक राहिले नव्हते. यामुळे एका ट्रक चालकाकडून काही पैसे उधार घेऊन त्यांनी जुनी सायकल खरेदी पाचशे रुपयांना खरेदी केली.

Video: आधुनिक युगातील 11 वर्षाचा श्रावणबाळ...

ज्योतीने वडिलांना धीर देत डबलशीट नेण्यार असल्याचे सांगितले. पण, वडिलांजवळ दुसरा पर्यायही शिल्लक नव्हता. अखेर, दोघांनी घरी जाण्याचे निर्णय घेतला आणि वडिल पाठीमागे बसले आणि ज्योतीने पँडल मारायला सुरवात केली. प्रवासादरम्यान अनेकजण त्यांच्याकडे पाहात होते. ज्योती वडिलांना धीर देण्याबरोबरच जिद्दीने सायकल चालवत होते. 10 मे रोजी सुरू केलेला प्रवास 16 मे रोजी संपला आणि दोघेही सुखरुप घरी पोहोचले.

Video: या लहानग्याची काय चूक हो?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown 15 years old girl and injured father travelled on bicycle bihar