लॉकडाऊनचा मोबाईल कंपन्यांनाही फटका, पण 'जिओ' दण दणा दण...

lockdown
lockdown
Updated on

मुंबई : कोरोना संकटाचा फटका सर्वच उद्योगांना बसला आहे. यात भर पडली आहे ती टेलिकॉम उद्योगाची. लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात देशातील टेलिकॉम कंपन्यांनी जवळपास 29 लाख ग्राहक गमावले आहेत. मात्र याच काळात रिलायंस जिओने 45 लाख नवे ग्राहक जोडले आहेत. एकीकडे मोबाईल कनेक्शनची संख्या कमी होत असतांना ब्राडबँड कनेक्शन घेणाऱ्यांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. मोबाईल गॅलरी बंद असल्यामुळे नवे कनेक्शन घेणे बंद झाल्याचा हा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ट्रायच्या ताज्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.

देशात एकूण टेलिफोन धारकांची संख्या 117.8 कोटी एवढी आहे. जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात ग्राहक संख्या 84 लाखाने वाढली होती. मात्र मार्च महिन्यात ग्राहकांच्या संख्येत 0.24 टक्क्याने  घट झाली आहे. या काळात भारती एयरटेल कंपनीने 13 लाख; तर वोडाफोनने आपले 64 लाख  ग्राहक गमावले आहे. BSNL या महिन्यात तब्बल 95,428 ग्राहक जोडले आहेत. मार्च महिन्यात रिलायंस जिओने 45 लाख नवे ग्राहक जोडले आहेत. याच महिन्यात रिलायंस जिओचे ग्राहक 45 लाखाने वाढले, आता रिलायंस जिओची एकूण ग्राहक संख्या 38.8 कोटी एवढी झाली आहे.

जिओकडे ग्राहकांचा ओढा का ?
गेल्या वर्षी टेलीकॉम कंपन्यांनी प्लॅनमध्ये 40 टक्के दरवाढ केली होती. मात्र रिलायंस जिओचे काही प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आणि आकर्षक असल्यामुळे अनेक ग्राहकांनी या काळात रिलायंस जिओला पसंती दिल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

ब्राडबँड कनेक्शन वाढले 
लॉकडाऊनच्या काळात बहुतांश  कर्मचारी घरातूनच काम करत होते.त्यामुळे फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात ब्राडबँड कनेक्शन घेणाऱ्यांच्या संख्येत 0.93 टक्के एवढी वाढ झाली आहे. ब्रॉडबँड कनेक्शनची संख्या 68.11 कोटीवरुन आता 68. 44 कोटी एवढी वाढली आहे.

देशातील ब्राडबँड मार्केट, कंपन्यांचा वाटा 

  • रिलायंस जिओ- 56.50 टक्के 
  • एयरटेल- 21.61
  • BSNL-3.56
  • आट्रीया – 1.61
  • वोडाफोन- 17.9

मोबाईल सेवा मार्केट, कुणाचा किती वाटा

  • वोडाफोन- 27.57 
  • BSNL- 10.35
  • MTNL-0.29
  • एयरटेल- 28.31
  • रिलायंस जिओ- 33.47 

लँडलाईन फोन मार्केट, कुणाचा किती वाटा 

  • एयरटेल- 21.73
  • वोडाफोन- 2.26
  • BSNL-43.16
  • रिलायंस कॉम- 2.50 
  • MTNL-15.30 
  • रिलायंस जिओ-5.39 
  • टाटा टेलि- 8.76

(संपादन : वैभव गाटे)

Lockdown also hit mobile companies It lost 29 lakh customers in March

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com