esakal | दिल्लीच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown main.jpg

लग्नामध्ये पाहुण्यांची संख्या 200 पर्यंत ठेवण्याची सूट देण्यात आली होती. परंतु, वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर 50 पर्यंत हा आकडा मर्यादित ठेवण्याची प्रस्ताव नायब राज्यपालांकडे पाठवला आहे. 

दिल्लीच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल सरकार दिल्लीत कोरोनाशी निपटण्यासाठी पुन्हा एकदा सक्तीचे धोरण अवलंबण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत याचे संकेत दिले आहेत. दिल्ली सरकारने एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. यामध्ये छोट्या स्तरावर लॉकडाऊनची परवानगी मागण्यात आली आहे. जर केंद्राने परवानगी दिली तर जास्त संसर्ग असलेल्या भागात लॉकडाऊन लावले जाऊ शकते. दिवाळी काळात बाजारात अत्यंत बेजबाबदारपणा दिसून आला आहे. लोकांनी मास्क घातला नव्हता, कोणीही सोशल डिस्टन्सिंगकडे लक्ष दिले नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. 

ते पुढे म्हणाले, जर आम्हाला बाजारात मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केलेले दिसले नाही आणि तो परिसर कोरोना हॉटस्पॉट बनू शकतो, असे वाटले तर काही दिवसांसाठी बाजार बंद करण्यासाठी दिल्ली सरकारला परवानगी दिली जावी, असा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारला पाठवली आहे. 

हेही वाचा- राहुल गांधींची चिंता असल्यामुळेच सोनियांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केलं - ओबामा

लग्नामध्ये पाहुण्यांची संख्या 200 पर्यंत ठेवण्याची सूट देण्यात आली होती. परंतु, वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर 50 पर्यंत हा आकडा मर्यादित ठेवण्याची प्रस्ताव नायब राज्यपालांकडे पाठवला आहे. 

दरम्यान, एक दिवसापूर्वीच दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी राजधानीत कोरोनाची तिसरी लाट येऊन गेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याची कोणतीच योजना नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही. लॉकडाऊन हे प्रभावी पाऊल असेल, असे मला वाटत नाही. सर्वांनी मास्क घालणे जास्त फायदेशीर आहे, असेही ते म्हणाले होते. 

हेही वाचा- VIDEO : रेड सीमध्ये केला अनोखा विक्रम; सलग सहा दिवस राहिला पाण्यात

दिल्लीत सोमवारी 3797 नवे रुग्ण आढळून आले. आता तेथील संख्या ही 4,89,2020 इतकी झाली आहे. दिल्लीत यापूर्वी दररोज 8,500 हून अधिक प्रकरणे समोर येत होती. 
 

loading image
go to top