राहुल गांधींची चिंता असल्यामुळेच सोनियांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केलं - ओबामा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

मला जाणवलं की सोनिया गांधी या अत्यंत चतुर आणि कुशाग्र बुद्धीच्या आहेत. त्यामुळेच त्या ताकदवर आहेत.

नवी दिल्ली- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 'अ प्रॉमिस्ड लँड' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. तत्पूर्वी, जगभरातील व्यक्ती आणि घटनांच्या पुस्तकातील उल्लेखामुळे अनेक नवे खुलासे होत आहेत. यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, तसेच सोनिया गांधी यांची अवघडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. आपल्या पुस्तकात ओबामांनी राहुल गांधी यांना 'नर्व्हस लीडर' म्हटले आहे. तर मनमोहन सिंग यांच्यापासून कोणताही धोका नसल्याने त्यांना सोनिया गांधींनी पंतप्रधान केले होते. सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांची अत्यंत विचारपूर्वक निवड केली होती, असे पुस्तकात म्हटले आहे. 

'अ प्रॉमिस्ड लँड' पुस्तकात ओबामांनी म्हटले की, कोणी एक नाही, अनेक राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोनिया गांधींनी मुख्य रुपाने मनमोहन सिंग यांची निवड का केली होती. कारण कोणताही राजकीय वारसा नसलेले वयोवृद्ध शीख त्यांच्या 48 वर्षीय पुत्रासाठी धोकादायक ठरु शकले नसते. त्यावेळी राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष होण्याची तयारी करत होते. ओबामा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी आयोजित सोनिया आणि राहुल गांधी सहभागी झालेल्या एका डिनर पार्टीचाही पुस्तकात उल्लेख केला आहे. 

हेही वाचा- भाजप खासदाराच्या नातीचा फटाके उडवताना भाजून मृत्यू

सोनिया गांधी अत्यंत चतुर आणि कुशाग्र- ओबामा

ते म्हणाले की, सोनिया गांधी या बोलण्यापेक्षा जास्त ऐकत होत्या. पॉलिसी मॅटरवर जर वेगळे विचार मांडण्यासारखी स्थिती आली तर अत्यंत सावधपणे मनमोहन सिंग यांच्यासमोर आपले मतभेद जाहीर करत असत आणि नेहमी चर्चेचा रोख हा आपल्या मुलाकडे वळवत. मला जाणवलं की सोनिया गांधी या अत्यंत चतुर आणि कुशाग्र बुद्धीच्या आहेत. त्यामुळेच त्या ताकदवर आहेत. 

हेही वाचा- प्लॅस्टिकपासून बनवलेलं घर तुम्ही पाहिलं का? खर्च आला फक्त साडेचार लाख रुपये

राहुल गांधी हे स्मार्ट आणि उत्साही दिसले. ते आपल्या आईप्रमाणेच सुंदर आहेत. त्यांनी प्रगतशील राजकारणाच्या भविष्यावर आपले विचार मांडले. यादरम्यान ते वारंवार थांबत असत आणि माझ्या 2008 च्या प्रचार मोहिमेबाबत चर्चा करत. ते आपला कोर्स पूर्ण करुन शिक्षकांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी वाटत होते. 

हेही वाचा- Positive Story : पत्नी आणि मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान; दररोज हजारो लोकांचे पोट भरणारा अवलिया


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manmohan Singh Not A Threat To Rahul Gandhis Future So Sonia Made Him PM Says Barack Obama