esakal | मुलगी पास झाली अभिनंदन! वडील म्हणाले, ती गेली हो...
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown father have no work no money girl death at agra

विद्यार्थिनीच्या वडिलांना प्राचार्यांनी फोन करून तुमची मुलगी पास झाली, अभिनंदन असे म्हणाले. पण, दुसऱया बाजूला जड अंतरकरनाने मुलगी जगातून निघून गेली हो, असे सांगताच प्राचार्यांनाही धक्का बसला. लॉकडाऊनदरम्यान उपचारासाठी पैसे नसल्यामुळे एका मुलीला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना येथे घडली आहे.

मुलगी पास झाली अभिनंदन! वडील म्हणाले, ती गेली हो...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

आग्रा (उत्तर प्रदेश): विद्यार्थिनीच्या वडिलांना प्राचार्यांनी फोन करून तुमची मुलगी पास झाली, अभिनंदन असे म्हणाले. पण, दुसऱया बाजूला जड अंतरकरनाने मुलगी जगातून निघून गेली हो, असे सांगताच प्राचार्यांनाही धक्का बसला. लॉकडाऊनदरम्यान उपचारासाठी पैसे नसल्यामुळे एका मुलीला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना येथे घडली आहे.

कोट्यवधींची संपत्ती पण खांदाही कोणी देईना...

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून, या पार्श्वभूमीवर देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण विविध ठिकाणी अडकले असून, हातावरचे पोट असणाऱया नागरिकांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेकांनी आपल्या घराकडे प्रवास सुरू केला आहे. प्रवासादरम्यानही अनेकांना जीव गमवावा लागत आहेत. अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत.

गर्भवती पत्नी; समोर चिमुकला अन्‌ दारूसाठी तडफड...

शहरातील राम सिंग हे फिटरचे काम करतात. पण, लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे घरातील सर्व साहित्य संपले. शिवाय, जवळ पैसेही नव्हते. दरम्यानच्या काळात मुलगी आजारी पडली. उपचारासाठी जवळ पैसे नव्हते. 28 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. राम सिंग म्हणाले, गेल्या दीड महिन्यापासून घरातच आहे. आठवड्यापूर्वी 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. मुलगी आजारी होती आणि तिच्यासाठी औषधच काय पण खायला घालण्यासाठीही काही शिल्लक नव्हते. आता दुसऱ्या मुलीची सुद्धा तब्येत बिघडली आहे. तिच्यावर उपचार करण्यासासाठी सुद्धा पैसे नाहीत. काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यासमोर क्वारंटाइन सेंटरमध्ये येणाऱ्या जेवणाच्या पाकिटातील उरलेली पाकिटे पोलिस द्यायचे. त्यामुळे कसेबसे पोट भरायचे. आता सेंटर बंद झाल्यामुळे तेही मिळत नाही.'

दागिन्यांनी सजलेल्या दुकानात दिसताहेत कांदे, बटाटे...

'मुलगी जवळच्या शाळेत शिक्षण घेत होती. प्राचार्यांनी फोन करून मुलगी पास झाल्याचे सांगताच कंठ दाटून आला. जड अंतकरणाने मुलीचा मृत्यू झाल्याचे प्राचार्यांना सांगितले. त्यानंतर प्राचार्यांनी काही सामाजिक संस्थांना मदत करण्यास सांगितले. त्यानंतर एका संस्थेने धान्य आणि काही पैसे दिले आहेत,' असेही राम सिंग यांनी सांगितले.

loading image
go to top