Video: भुकेमुळे युवक खातोय मेलेले कुत्र...

वृत्तसंस्था
Friday, 22 May 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, लॉकडाऊमुळे अनेकांचे हाल होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, एक युवक रस्त्यावर मेलेल्या कुत्र्याचे मांस खाताना दिसत आहे.

जयपूर (राजस्थान): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, लॉकडाऊमुळे अनेकांचे हाल होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, एक युवक रस्त्यावर मेलेल्या कुत्र्याचे मांस खाताना दिसत आहे.

नागाचा फणा अन् कोंबडीची चोच; पाहा व्हिडिओ...

लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्यामुळे अनेकजण पायी घराकडे निघालेले दिसतात. पायी चालल्यामुळे अनेकांचे हाल होऊन जीव जाताना दिसत आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुरांची छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर भीषण वास्तव समोर येत आहे. अनेकसेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. पण, ही मदत अपुरी पडत आहे. हाल होणाऱयांमध्ये लहानमुले, वृद्धांचाही समावेश आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावरील अपघातात मेलेल्या कुत्र्याचे मांस खाताना युवक दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली आहे की अन्य कशामुळे हे समजू शकले नाही. पण, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बिकट परिस्थितीची जाणीव होते. प्रधुम्न सिंह नरुका नावाच्या युवकाने हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

...म्हणून चोरली सायकल; माफीनामा व्हायरल

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'जयपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर दिल्ली-जयपूर-अजमेर बायपासवरील हा व्हिडिओ आहे. प्रधुम्न यांनी या तरुणाची चौकशी केली. पण, या तरुणाला माहिती सांगता येत नव्हती. पण, भुकेमुळे त्या युवकाची परिस्थिती बिकट झाल्याचे दिसत होते. त्याची अवस्था पाहून त्याला खायला दिले आणि याबाबातची माहिती पोलिसांना दिली. पोलिस मांस खाणाऱया युवकाचा शोध घेत आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown hungry man eating dead dog meat video viral from rajasthan