esakal | उत्तर प्रदेशात 4 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन; योगी सरकारचा मोठा निर्णय

बोलून बातमी शोधा

उत्तर प्रदेशात 4 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन; योगी सरकारचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेशात 4 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन; योगी सरकारचा मोठा निर्णय
sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने राज्यामधील वीकेंड लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून लागू होणारा वीकेंड लॉकडाऊनन यावेळी चार मे अर्थात मंगळवारी सकाळी सातपर्यंत सुरु राहणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाले आहेत. कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाल्याने सरकार वीकेंड लॉकडाऊनमध्ये वाढ करत आहे.

बाजार, कार्यालये राहतील बंद

उत्तर प्रदेश सरकारने आपल्या आदेशात म्हटंलय की, या दरम्यान सर्वप्रकारचे बाजार, खासगी तसेच सरकारी कार्यालये मंगळवार सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहतील. सरकारने लोकांना आपापल्या घरामध्ये राहण्याची विनंती केली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान केळव अत्यावश्यक सेवांसाठीच परवानगी असेल. लॉकडाऊनच्या दरम्यान मेडीकल, हॉस्पिटल्स आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. या दरम्यान सर्व प्रकारची धार्मित स्थळे बंद राहतील.

हेही वाचा: बद्रीनाथ-केदारनाथाचं दर्शन यंदाही नाही

कोर्टाकडूनही लॉकडाऊन लावण्याची विनंती

उत्तर प्रदेशातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन तसेच मेडीकल सुविधांतील कमतरता पाहता अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी राज्यात लॉकडाऊन लावण्याचे आदेश सरकारला दिले होते. उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या परिस्थितीवर सुनावणी करताना जस्टीस सिद्धार्थ वर्मांच्या पीठाने म्हटलंय की, आम्ही आपल्याला विनंती करतो की, जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर दोन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यात यावा.

याआधी कोर्टाने लखनऊ, प्रयागराज, कानपूर, वाराणसी आणि गोरखपूर या पाच शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले होते मात्र, कोर्टाच्या या आदेशाच्या विरोधात योगी सरकार सुप्रीम कोर्टात गेली. राज्य सरकारच्या अपील नंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला रोखलं. बुधवारी उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे नवे 29,824 रुग्ण सापडले आहेत. तसेच 266 जणांचा मृत्यू झाला आहे.