कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय नाही : राजन

Raghuram-Rajan
Raghuram-Rajan

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी गव्हर्नमेंट कोरोनाला रोखण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी पूर्ण भारत लॉकडाऊन जाहीर केला आहे. दोन दिवसांमध्ये दिसून आलेल्या परिणामानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. 

कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन हा पर्याय पुरेसा नसल्याचे राजन यांचे म्हणणे आहे. लोक कामावर जरी जात नसल्याने ते घरी राहत आहेत. मात्र, झोपडपट्टी किंवा दाट लोकवस्ती असलेल्या भागात लोक एकमेकांच्या आसपास राहत असतात. 

गरीब लोकांची अग्निपरीक्षा 

ब्लूमबर्गने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टमध्ये राजन यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणे कठीण आहे. लॉकडाऊनमुळे गरीब लोकांसमोरील अडचणींमध्ये वाढ होत जाईल. केंद्र सरकारने २१ दिवसांचा मोठा लॉकडाऊन घोषित केला असल्याने देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळणार आहे. कोट्यवधी लोक घरीच बसून राहणार असल्याने आहार आणि औषधांची कमतरता उद्भवण्याची जास्त शक्यता आहे. तसेच कमकुवत सामाजिक संरचनेमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक संकटे निर्माण होणार आहेत. 

देशा-देशांमधील समन्वय महत्त्वाचा

कोरोना व्हायरसचे संकट फक्त भारतावरच नाहीय. जगभरातील निम्म्याहून अधिक देश या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत देशादेशांमधील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक देश थोड्याफार प्रमाणात दडपणाखाली आला असल्याने काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागणार आहे. मात्र, दुसऱ्याकडे लक्ष्य द्यायच्या नादात आपण आपल्या देशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

रुग्णांची संख्या ६०० पार

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक भारतीय नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत ६०९ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून आतापर्यंत १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. जगभरात आतापर्यंत २.६५ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २१ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com