esakal | Fight with Corona : राहुल गांधींनी केलं मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले 'सरकारने...'
sakal

बोलून बातमी शोधा

Gandhi-Modi

देशात कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये, याची सरकार दखल घेत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

Fight with Corona : राहुल गांधींनी केलं मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले 'सरकारने...'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या वर्गासाठी मोदी सरकारने गुरुवारी (ता.२६) एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाचे कौतुक काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत नव्या पॅकेजची माहिती दिली. कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार महत्त्वाची पावलं उचलताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटी रुपयाच्या नव्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे राहुल गांधी यांनी स्वागत केले आहे.

 - लष्कराच्या मदतीची वेळ येऊ देऊ नका :उपमुख्यमंत्री अजित पवार

राहुल आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, 'लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार तसेच महिला वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, त्यांचे या देशावर मोठे ऋण आहेत. त्यांच्यासाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे योग्य दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे.'

- आहारात घ्या, 'क' जीवनसत्व असलेली फळे! वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'देशात कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये, याची सरकार दखल घेत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.'

- प्रत्येकाला मिळणार जास्तीचे 5 किलो धान्य, तर गरिबांसाठी 1.7 लाख कोटींचे पॅकेज

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाच्या जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. मात्र, यामुळे कोरोनाला लगेच आळा घालता येणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊनची घोषणा केली. या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने सरकारने वेळीच पाऊल उचलत या नव्या पॅकेजची घोषणा केली.

- गुड न्यूज : 1 एप्रिलपासून वर्तमानपत्र येणार तुमच्या घरात

loading image