esakal | Video लय भारी; क्रिकेटचा असा खेळ कधी पाहिलाच नसेल...

बोलून बातमी शोधा

lockdown tiktok video of single player playing cricket

देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असताना अनेकजण घरामध्ये बसून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसतात. एक टिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकांना हसू आवरेनासे झाले आहे.

Video लय भारी; क्रिकेटचा असा खेळ कधी पाहिलाच नसेल...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असताना अनेकजण घरामध्ये बसून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसतात. एक टिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकांना हसू आवरेनासे झाले आहे.

Video: ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी झुंबड...

घरामध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ अपलोड होताना दिसत आहेत. एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये एकच खेळाडू क्रिकेट खेळताना दिसत आहे. क्रिकेट खेळण्यासाठी साधारणत: 11 खेळाडूंची गरज असते. या व्हिडीओ एकच खेळाडू प्रथम गोलंदाजी करून धावत दुसरीकडे जातो. मग हातात बॅट घेऊन फलंदाडी करतो. मग दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करून चेंडू अडवतो. हे सगळं झाल्यानंतर स्वत:च स्वत:ला रनआऊट करून अपील करतो आणि शेवटी पंच बनून बाद असा निर्णयही देतो. पंचांच्या निर्णयानंतर एकटाच आनंदाने नाचू लागतो.

@rajvendersingh

Lockdown@day4##LifebuoyKarona ##1milllionauditon #@harpreetharry9 @jayvindersingh

♬ original sound - chand

Video: पाकची दुरावस्था; काय चोरतात पाहा...

संबंधित व्हिडीओमागे ''मेरे हालात ऐसे हैं कि मैं कुछ कर नहीं सकता...'' , हे गाणे सुरू आहे. रवी सिंग या प्रसिद्ध टीकटॉक स्टारने हा व्हिडिओ शेअर केला आहे. लाखो नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिला असून लाईक केला आहे.

Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...