Lok Sabha 2024:  निवडणूक जाहीर झाल्यापासून शपथ विधीपर्यंत, सरकार स्थापनेची संपूर्ण प्रक्रिया काय आहे?

The entire process of forming a government: सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा देणे गरजेचे आहे
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024esakal

 Lok Sabha 2024 : 

भारतात दर पाच वर्षांनी देशातलं अन् राज्यातलं सरकार बदलतं. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. आता सत्ता स्थापन करण्याकडे नेत्यांचा कल आहे. भाजपचे नेते नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं ९ जून रोजी शपथ घेणार आहेत.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापासून ते निवडणुका पार पडून निकाल हाती येईपर्यंत सर्वांचीच धावपळ सुरू असते. निकाल लागला म्हणजे सत्ता स्थापन झाली, सरकार आलं असं म्हणता येणार नाही. निकालानंतर पंतप्रधानांचा राजिनामा, सत्ता स्थापनेचा दावा आणि शपथविधी या सर्व प्रक्रियाही पार पडतात. त्याचाच एक आढावा घेऊयात.

Lok Sabha 2024
Loksabha Election Result 2024 :भूसंपादन ठरला कळीचा मुद्दा? अयोध्येत भाजपचं कुठं चुकलं

निवडणूक पार पडते

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा निवडणूक आहे. १८ व्या लोकसभेसाठी १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक-२०२४ च्या तारखा जाहीर केल्या होत्या. आयोगाच्या घोषणेनुसार १९ एप्रिलपासून ७ टप्प्यात मतदान होणार होते. ४ जून ही मतमोजणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.

मतमोजणी पूर्ण होते

लोकसभा निवडणुकीनंतर मतमोजणी हा महत्त्वाचा टप्पा असतो. कोणत्या पक्षाचे सरकार बनणार हे मतमोजणीद्वारे निश्चित केले जाते. मतमोजणीतूनच कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळाले हे ठरते. यावेळी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी झाली.

ज्यामध्ये भाजपच्या आघाडीच्या एनडीएला बहुमत मिळाले आहे. भाजपला २४० जागा मिळाल्या आहेत, तर एनडीएच्या घटक पक्षांसहीत २९२ जागा मिळाल्या आहेत.

पंतप्रधान राजीनामा देतात

निवडणुकांचा निकाल हाती येईपर्यंत नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होते. पण निकालानंतर तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा देणे गरजेचे आहे. त्याशिवाय पुन्हा सरकार स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्रपती माजी पंतप्रधानांना नवीन पंतप्रधानांच्या शपथविधीपर्यंत कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम करण्याची विनंती करतात.

Lok Sabha 2024
Jalna Loksabha Result : साबळेंचा ‘फुलटॉस’ दानवेंची विकेट!

संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड

मतमोजणी संपल्यानंतर, ज्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळते, तो पक्ष आपला नेता निवडतो. १८ व्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. त्यानंतर NDA ने नरेंद्र मोदींना नेता म्हणून एकमताने निवडले आहे.

सरकार स्थापनेसाठी दावा करणे

लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर बहुमत मिळालेल्या पक्षाला राष्ट्रपती सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतात. यानंतर बहुमत असलेला पक्ष राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींना भेटतो आणि सरकार स्थापन करण्याचा दावा करतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी एनडीए आघाडीचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची लवकरच भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करू शकतात.

Lok Sabha 2024
Sangli Loksabha : सांगलीसह काही जागा सोडायला नको होत्या;काँग्रेसची भूमिका, विधानसभेसाठी लवकरच जागावाटप

शपथविधी

राष्ट्रपतींनी सरकार स्थापन करण्यासाठी संमती दिल्यानंतर, पक्ष शपथविधीची तारीख आणि वेळ जाहीर करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी एनडीए आघाडी सरकारचा शपथविधी ९ जून रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता होणार आहे.

Lok Sabha 2024
Loksabha Election Result : अनेक केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का

मंत्रिमंडळाचा विस्तार

सरकार स्थापनेनंतर सर्वात महत्त्वाचे काम असते ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार करणे होय. निवडून आलेल्या खासदारांकडे विविध खात्यांची जबाबदारी स्विकारली जाते. अनेक वेळा केंद्र आणि राज्य मंत्र्यांच्या नावांची घोषणा आणि सरकारचा कार्यकाळ यामध्ये काही दिवसांनंतरही सरकार बदल करू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com