लोकसभेत गोंधळ; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून, भाजप-काँग्रेस सदस्य भिडले

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज, लोकसभेत गोंधळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याला भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. यावरून भाजप आणि काँग्रेस सदस्य एकमेकांना भिडले आहेत. त्यामुळं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी एक वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं होतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले? 
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं. त्यात त्यांनी, 'तरुणांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय, देशाची प्रगती होणार नाही,' असे सांगताना राहुल यांनी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून काल, निवेदन देताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले होते. 'मी माझे सूर्यनमस्कार वाढवेन आणि लाठ्या खाण्यासाठी माझी पाठ मजबूत करून घेईन.', असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत करून, सत्ताधारी बाकांवरून टाळ्या मिळवल्या होत्या. आज, पुन्हा याच मुद्द्यावरून सभागृहात काँग्रेस-भाजप सदस्य आमने-सामने आले आहेत. 

आणखी वाचा - नगरमध्ये भाजपचा शिवसेनेला धोबीपछाड; आघाडीलाही धक्का

आणखी वाचा - मुंढेंचे काम कसे ते देवेंद्रजींना विचारा!

मोदींचा एकेरी उल्लेख
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याला भाजप सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 
सभागृहामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री हर्षवर्धन बोलत होते. त्यावेळी काँग्रेस खआसदार ममिकम टागोर डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे धावून आले. हा प्रकार अतिशय दुदैवी असल्याचं मत भाजप खासदार जगंदबिका पाल यांनी व्यक्त केलंय. डॉ. हर्षवर्धन यांना धक्काबुक्की करण्याचा विरोधी काँग्रेस सदस्यांचा प्रयत्न होता, असा आरोप संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला. 

ये जो नरेंद्र मोदी भाषण दे रहा है| हिंदुस्तान के युवा इसको ऐसा डंडा मारेंगे की, छह महिनेबाद ये घर से बाहर नहीं निकल पायेगा| 
- राहुल गांधी, नेते, काँग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lok sabha adjourned after uproar over Rahul Gandhi statement on pm Modi